Monday, July 1, 2024

‘लोक आमच्या साधेपणाचा फायदा घेत आहेत’ बॉयकॉट बॉलिवूडवर अर्जुन कपूरने सोडले मौन

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड आहे. आधी ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा हॅशटॅग चढला, त्यानंतर नेटिझन्सनी अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटावर निशाणा साधला. सोशल मीडिया यूजर्स आता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’, रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ आणि हृतिक रोशनच्या विक्रम वेधावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहेत. संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीवर बहिष्कार टाकण्याची मागणीही लोक करत आहेत आणि सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड हॅशटॅगचा ट्रेंड सुरू आहे.

माध्यमांशी संवाद साधताना अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बहिष्काराच्या ट्रेंडवर प्रतिक्रिया देताना म्हणाला, “मला वाटते की, आम्ही गप्प बसून चूक केली आणि ही आमची शालीनता होती पण लोक त्याचा फायदा घेत आहेत. ‘हमारा काम बोलेगा’ असा विचार करून आपली चूक झाली असे मला वाटते.” अर्जुन कपूर पुढे म्हणतो, “मला वाटते की, आम्ही ते सहन केले म्हणून लोकांनी ही सवय लावली आहे. आपण एकत्र येऊन याबद्दल काहीतरी केले पाहिजे कारण लोक आपल्याबद्दल जे लिहितात ते वास्तवापासून दूर आहे. जेव्हा आम्ही बॉक्स ऑफिसवर चांगले काम करणारे चित्रपट करतो तेव्हा लोक आम्हाला आमच्या आडनावामुळे नाही तर चित्रपटामुळे आवडतात.”

अर्जुनच्या या वक्तव्यामुळे नेटिझन्स संतप्त झाले असून ते त्याला ट्रोल करत आहेत. एका नेटिझनने लिहिले की, ‘अर्जुन कपूर त्याच्या मनाचे बोलू शकतो कारण त्याचे चित्रपट कोणीही पाहत नाही. कदाचित कोणी बहिष्काराची हाक दिली असती तर लोकांच्या लक्षात आले असते की त्यांचाही चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जसे ते म्हणतात की कोणतीही प्रसिद्धी ही चांगली प्रसिद्धी असते.”

अभिनेत्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, तो शेवटचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ मध्ये दिसला होता ज्याने बॉक्स ऑफिसवर सरासरी व्यवसाय केला होता. या चित्रपटाने आतापर्यंत ४० .९० कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे, आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर अर्जुनकडे सध्या ‘कुट्टी’ आणि ‘द लेडी किलर’ सारखे चित्रपट आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

जास्मिन भसीन प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज, व्यक्त केली उत्सुकता
राहुल नागलच्या आधी करण कुंद्राला डेट करत होती श्रद्धा आर्या? अभिनेत्रीने केला खुलासा
अभियांत्रिकी सोडून शरत सक्सेनाने मनोरंजन विश्वात पदार्पण, पण ‘या’ लोकप्रिय व्हिलनला आहे ही भीती

 

हे देखील वाचा