चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक भन्नाट किस्से घडत असतात. कलाकार बऱ्याचदा सोशल मीडियामधून ते किस्से आपल्या चाहत्यांसोबत शेयर करत असतात. अलीकडेच अर्जुन कपूरने आपल्यासोबत घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. ‘सरदार का ग्रँडसन’ चित्रपटाच्या सेटवर त्याला डॉबरमन जातीच्या कुत्र्याने त्याच्या पायाचा चावा घेतला होता. कुत्र्याने इतक्या जोरात चावा घेतला की, अर्जुनच्या पायावर आयुष्यभरासाठी खूण उमटली आहे.
या घटनेविषयी बोलताना अर्जुन म्हणाला, “आम्ही कुत्रा चावतोय हा एक सीन चित्रीत करत होतो, आणि या घटनेत कुत्र्याने खरच चावा घेतला होता. सीन असा होता की, मी सरदारांना भेटायला खूप वर्षानंतर माझ्या घरी परतलो होतो. या सीनमध्ये कुत्रा एखाद्या अज्ञात व्यक्तीला बघून तो माझ्यावर हल्ला करतो. म्हणून मी १,२ दिवस आधीच कॅमेरामागे बारूदसोबत (कुत्रा) वेळ घालवत होतो, जेणेकरुन तो मला ओळखेल. “
अर्जुन पुढे म्हणाला, ‘शूटिंगच्या दिवशी आम्ही बराच वेळ सीन चित्रीत करत होतो. माझ्या आणि बारूदच्या सीनचा खूप वेेळा रिटेक झाला होता. शूटिंगच्या दरम्यान, एका सहाय्यकाने माईक घेतला, आणि म्हणाला ‘चाव’ आणि हा आदेश मलाच आहे समजून, बारूद माझ्या दिशेने पळत आला, आणि त्याने माझ्या पायाचा चावा घेतला. मी त्याला लगेच ‘हील’ असे सांगितल्याबरोबर तो ताबडतोब माझ्या बाजूला येऊन उभा राहिला. माझ्या पायावर आयुष्यभर ही खूण राहणार असून मला नेहमी आठवत राहील.’
अर्जुन कपूरच्या मुख्य भूमिकेसह ‘सरदार का ग्रँडसन’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर १८ मे रोजी ऑनलाईन प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर व्यतिरिक्त रकुल प्रीत सिंग, नीना गुप्ता, कंवलजीत सिंग, जॉन अब्राहम, अदिती राव हैदरी आणि कुमुद मिश्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त मलायका अरोरासोबतच्या त्यांच्या अफेअरविषयी चांगलाच चर्चेत आहे. त्यांच्या मालदीव ट्रीपची चर्चाही फारच होताना दिसत आहे .
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-धर्मेश इज बॅक! कोरोनावर मात करत कोरिओग्राफर पोहोचला ‘डान्स दीवाने ३’ च्या मंचावर