आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आदित्य धर दिग्दर्शीत हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे तसेच या चित्रपटांमुळे यातील कलाकांर सुद्दा चर्चेत आहेत.
‘धुरंधर 2’ या चित्रपटातीलमेजर इक्बालच्या भूमिकेसाठी प्रशंसा मिळवलेला अभिनेता अर्जुन रामपाल लवकरच एका ओटीटी मालिकेत दिसणार आहे. ती मालिका म्हणजे ‘बिलियनेअर्स’ आहे. तर हि मालिका एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होईल. आणि याची घोषणा नुकतीच करण्यात आली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता आणि रॉबी ग्रेवाल यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका आहे. अनुभव चोप्रा आणि शांतनु सागर यांनी हि मालिका लिहिली आहे. तर ऑलमायटी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली प्रभलीन संधू यांनी निर्मित केली आहे.
अर्जुन रामपाल (rampaal)यांने यात उत्तम काम केले आहे. तर ॲमेझॉन एमएक्स प्लेयरचे कंटेंट हेड, अमोघ दुसाद यांच्या मते, “‘बिलियनेअर’ ही महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि यशाची किंमत याबद्दलची कथा आहे. हन्सल मेहता आणि रॉबी ग्रेवाल हे चित्रपट निर्माते आहेत. अर्जुन रामपालने आतापर्यत अनेक उत्तम चित्रपटामध्ये कामगिरि केली आहे. तर ‘बिलियनेअर्स’ ही मालिका एमएक्स प्लेयरवर विनामुल्य उपलब्ध होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
33 वर्षांपूर्वीचा हा भुताटकी शो, आजच्या हॉरर मालिकांपेक्षा अजूनही ठरतो भारी










