Wednesday, July 3, 2024

जया बच्चन यांनी दिली होती अभिनेता अर्शद वारसीला अभिनयाची पहिली संधी, १७ वर्षांच्या वयात करायचा कॉस्मेटिक कंपनीत काम

आज बॉलिवूडचा एक सुप्रसिद्ध अभिनेता असणाऱ्या अर्शद वारसीची आर्थिक परिस्थिती चित्रपटात येण्यापूर्वी चांगली नव्हती. त्यामुळे त्याला खूप संघर्ष करावा लागला. त्याने १९९६ मध्ये ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. १९ एप्रिल, १९६८ मध्ये जन्मलेल्या अर्शदने त्याच्या कारकीर्दीसंदर्भात अनेक मोठमोठे खुलासे केले आहेत. सतत कामाच्या शोधात भटकत असतानाच्या वेदनांबद्दलही तो बोलला.

मुंबईत जन्मलेल्या अर्शदच्या आई- वडिलांचे निधन तो अवघ्या १४ वर्षांचा असताना झाला होता. यानंतर त्याच्या आयुष्यात बरेच चढ- उतार आले. आपले आयुष्य व्यतीत करण्यासाठी त्याने १० वीनंतर शिक्षण सोडून पैसे कमावण्यावर लक्ष केंद्रित केले होते. शिक्षण सोडल्यानंतर त्याने सेल्समॅन म्हणून एका कॉस्मेटिक कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्याचे वय केवळ १७ वर्षे होते.

अर्शदने एका मुलाखतीत खुलासा केला की, पहिल्या चित्रपटानंतर त्याला कशाप्रकारे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रॉडक्शन हाऊस एबीसीएलच्या (ABCL) बॅनरखाली अर्शदचा पहिला चित्रपट ‘तेरे मेरे सपने’ तयार झाला होता, हा चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी जया बच्चन यांनी त्याला अभिनयाची पहिली संधी दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arshad Warsi (@arshad_warsi)

अर्शदने त्याच्या कारकीर्दीत बरेच चित्रपट केले, परंतु २००३ साली ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटाद्वारे त्याला खरे यश मिळाले. या चित्रपटातील त्याचे ‘सर्किट’ हे पात्र अजूनही प्रेक्षकांची पहिली पसंती आहे.

अर्शदने आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल सांगताना म्हटले की, त्याच्या संघर्षाच्या काळात पत्नी मारिया नोकरी करायची. यावेळी त्यांचे घर पत्नीच्या पगारावर चालत असे. यासाठी तो नेहमीच त्याच्या पत्नीचे आभार मानतो.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये संजय दत्तशिवाय अर्शद वारसीची भूमिकाही प्रचंड गाजली. यानंतर त्याने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. त्याच्या शानदार चित्रपटांमध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ तसेच ‘गोलमाल’च्या सर्व सीरिज, ‘धमाल’, ‘जॉली एलएलबी’, ‘इश्किया’ आणि ‘देढ इश्किया’ यांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा