Saturday, July 6, 2024

पोलखोल! लीप फिलिंगनंतर बिग बॉस फेम अर्शी खानने केली पुन्हा कॉस्मॅटिक सर्जरी?

अर्शी खान हिला अभिनेत्री म्हणावे की नाही मुळात हाच प्रश्न असतो. मनोरंजनविश्वात असली तरी ती बिग बॉस व्यतिरिक्त कुठेही दिसत नाही. बिग बॉसमध्ये देखील तिला फक्त भांडणं करण्यासाठी घेतले जाते असे वाटते. बर आता याच अर्शीने तिची दुबईमध्ये एक सर्जरी केली असल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार अर्शीने नुकतीच तिची हिप अर्थात तिच्या नितांब्यांची सर्जरी केली आहे. मात्र याबद्दल अजून तिने काहीही माहिती दिली नाही.

अर्शी खानने नेहमीच तिच्यास्तही विविध कॉस्मेटिक सर्जरीचा पर्याय निवडत असते आणि अशा सर्जरी करून घेत असते. तिने एकदा सांगितले पण होते की, “सुंदर दिसण्यासाठी अशा सर्जरी करणे एखाद्याची व्यक्तिगत आवड असते. मात्र आपल्या समाजामध्ये याला अपराध मानून त्यावर टिंगल उडवली जाते. मला वाटते की मेट्रो शहरांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकं हे करताना दिसतात. हे श्रेय नाही तर हा एक आनंद आहे. आपण असे काही तंत्रज्ञान वापरून चांगले दिसू शकतो. मी माझे लिप्स देखील फिलर केले होते. ज्यात मला आनंद मिळाला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ARSHI KHAN AK (@arshikofficial)

दरम्यान २०१६ च्या ऑक्टोबर महिन्यात एका मोठ्या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार तिला पुणे पोलिसांनी एका से’क्स रॅकेटमध्ये अटक केली होती. अर्शीसोबतच विपुल दहल नावाच्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली होती. अर्शी गोव्यात देखील अशा रॅकेटमध्ये अडकली होती. तिला पोलिसांनी एका हॉटेलमधून अटक केली होती.

अर्शी खानने २०१५ साली तिने एक व्यक्तव्य करत मोठा हंगामा केला होता. ती म्हणाली होती की तिने पाकिस्तानी क्रिकेटर असणाऱ्या शाहिद आफरेदीसोबत बेड शेअर केला आहे. त्यांनतर तिने सोशल मीडियावर लिहिले देखील होते की, “तिला कोणासोबत बेड शेअर करायचा यासाठी भारतीय मीडियाची परवानगी घ्यावी लागेल का? ते तिचे वैयक्तिक आयुष्य आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी: अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला
ये है मोहब्बतें फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, गोव्यात मोठ्या दणक्यात केले लग्न

हे देखील वाचा