‘बिग बॉस’ (Bigg Boss) या रियॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेल्या कलाकारांपैकीच एक आहे अर्शी खान (Arshi Khan). शोनंतर तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असते. एकदा तर तिने नग्न होऊन पत्रकार परिषद केली होती. काय, झालात ना चकित? पण हे खरे आहे. अर्शीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळी तिला अनेकांनी विरोधही केला होता, कारण तिने नग्न होऊन अंगावर तिरंगा रंगवला होता.
खरं तर, अर्शी खानने २०१६ मध्ये घोषणा केली होती की, जो कोणी भारत-पाकिस्तान सामना जिंकेल, ती नग्न होऊन तिच्या अंगावर त्या देशाचा झेंडा रंगवेल. (arshi khan got naked at a press conference)
नग्न होऊन घेतली पत्रकार परिषद
या क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर अर्शी खानने नग्न होऊन प्रेस कॉन्फरन्स केली. मात्र, अर्शीने तिचे शरीर बेडशीटने झाकले होते. प्रेस कॉन्फरन्स दरम्यान अर्शी म्हणाली होती, की “मी म्हटले होते की, जर भारत जिंकला तर मी माझ्या अंगावर तिरंगा काढेन, तर मी तो काढलाय. पण मी असेही म्हटले होते की, जर पाकिस्तान म्हणजे आफ्रिदी साहेब जिंकले तर माझ्या अंगावर पाकिस्तानचा झेंडा काढेन. पण पाकिस्तान हरला.” अर्शी खानच्या या व्हिडिओला प्रचंड विरोध झाला होता. माध्यमातील वृत्तानुसार, अर्शी खानवर तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
शाहिद आफ्रिदीला म्हणाली तिच्या बाळाचे वडील
व्हिडिओमध्ये अर्शी खानने असेही सांगितले होते की, ती पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi) मुलाची आई होणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये बाळाला जन्म देणार आहे. तिने स्वतः सांगितले होते की, शाहिद आफ्रिदीशी तिचे संबंध आहेत आणि ती त्याच्या मुलाची आई होणार आहे. मात्र, काही दिवसांनी अर्शीने सांगितले की, हा सगळा पब्लिसिटी स्टंट होता.
‘बिग बॉस’च्या घरात केलाय बराच हंगामा
अर्शी खान ‘विश’ आणि ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ सारख्या टेलिव्हिजन शोचा एक भाग राहिली आहे. तसेच तिने स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस’च्या घरातही चांगलाच गोंधळ घातला होता. अर्शीने तिच्या नुकत्याच दिलेल्या निवेदनात सांगितले की, तिला काही क्षेत्रांपुरते मर्यादित राहायचे नाही, म्हणूनच ती आजकाल कुस्ती शिकत आहे.
हेही नक्की वाचा –