Saturday, July 6, 2024

काय सांगता! अफगाणिस्तावर तालिबानने मिळवलेल्या ताब्यानंतर बिग बॉस फेम अर्शी खानचे मोडले लग्न

 

जगभरातील सर्वच लोकं अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर अनेक भारतीय कलाकारांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये देखील असे काही कलाकार आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अफगाणिस्तानशी संबंध आहे. यातीलच काही कलाकारांनी शक्तिशाली देशांना अफगाणिस्तानला तालिबानपासून मुक्त करण्याचे आवाहन केले आहे. टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम अर्शी खानने अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. इतकेच नव्हे तर ती अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूशी लग्न करणार असल्याचे ही उघड केले.

अर्शी खानने सांगितले की, ‘अफगाणिस्तानमधील वाईट परिस्थितीमुळे ती एका अफगाणी क्रिकेटपटूशी लग्न करू शकणार नाही.’ ती पुढे म्हणाली की, ‘क्रिकेटरची निवड तिच्या वडिलांनी केली आहे.’ अर्शीने त्या क्रिकेटपटूचे नाव उघड केले नसले तरी तो मुलगा अफगाणच क्रिकेटर असल्याचे तिने जाहीर केले.

एका माध्यमाच्या माहितीनुसार ती म्हणाली की, “ऑक्टोबरमध्ये माझे अफगाणिस्तानच्या एका क्रिकेटपटूशी लग्न होणार होते. त्याला माझ्या वडिलांनी निवडले होते. पण अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर आम्हाला हे संबंध संपवावे लागले.”

 

अर्शी खानने असे ही म्हटले की, ‘ती त्या क्रिकेटपटूशी एक मित्र म्हणून बरेच दिवस बोलत होती. तो क्रिकेटपटू हा त्याच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे, पण आता हे नाते होणार नाही.’ असेही ती पुढे म्हणाली. त्याचबरोबर पुढे म्हणाली की, ‘मला वाटते की माझे वडील आता माझ्यासाठी एक भारतीय मुलगा शोधतील.’

अर्शी म्हणाली की, “मी एक अफगाण पठाण आहे आणि माझे कुटुंब युसूफझाई वंशीय गटातील आहे. माझे आजोबा अफगाणिस्तानातून स्थलांतरित झाले होते आणि भोपाळमध्ये आले. तिथे ते एक जेलर होते. मी मुळेची अफगाणिस्तानची आहे, पण आता मी एक भारतीय नागरिक आहे, जसे माझे आई-वडील आणि आजी-आजोबा.” अर्शी खानचे कुटुंब जेव्हा अफगाणिस्तानातून भारतात आले तेव्हा अर्शी फक्त ४ वर्षांची होती.

अर्शी खान पहिल्यांदाच बिग बॉस ११ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. बिग बॉसमुळे अर्शी खूप लोकप्रियता मिळाली होती. यानंतर ती बिग बॉसच्या शेवटच्या सीझनमध्ये ती चॅलेंजर्स म्हणून आली. इथेही तिने लोकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा