Tuesday, June 25, 2024

शिव ठाकरे नाही तर ‘या’ स्पर्धकाने पटकवली बिग बॉस 16 ची ट्रॉफी? सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस 16 चा विजेता कोण असेल याकडे सगळ्यांचीच आतुरता लागली आहे. फायनल पाचमध्ये शिव ठाकरेची तुफान क्रेज पाहायला मिळत आहे. चाहत्यांच्या मते शिवच बिग बॉसचा विजेता ठरणार असं दिसून येत आहे. (दि, 12 फ्रेब्रुवारी) रोजी बिग बॉसचा ग्रॅंडफिनाले होणार आहे ज्याच्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र, अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये विजेताची ट्रॉफी भलत्याच स्पर्धकाच्या हातामध्ये दिसत आहे. 

यंदाचा बिग बॉस 16 (Bigg Boss) चा पर्व मराठमोळ्या शिव ठाकरेणे गाजवला. त्याची दमदार खेळी आणि मैत्राचे नातं टीकवणाऱ्या शिवने चाहत्यांच्या मनात मोठं स्थान निर्माण केलं आहे. पूर्ण सिझनमध्ये वेगवेगळ्या कारणासाठी सतत शिवने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. त्यामुळे सर्वाधिक चाहते हे शिवला सपोर्ट करत असून तोच विजेता ठरणार असा अंदाजही लावला जात आहे. मात्र, पूर्व स्पर्धक अर्शी खान (Arshi Khan) हिने फिनाले आधीच बिग बॉस 16 च्या विजेत्याचं नाव आणि फोटो शेअर केला आहे.

अर्शी खान हिने प्रियंका चहर चौधरी (Priyanka Char Chaudhary)चा फोटो शेअर करत ट्वीट केला ज्यामध्ये प्रियंकाच्या हातामध्ये बीग बॉसची ट्रॉफी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रियंकाच विजेता ठरल्याच्या बातम्यांना उधान आलं आहे. अर्शीच्या या पोस्टवर बिग बॉस चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याशिवाय अनेकांनी प्रियंकचं अभिनंदन केलं आहे. मात्र, खरा विजेता किंवा विजेती कोण असणार हे दोन दिवसानंतर पाहायला मिळत आहेत.

बिग बॉस 16 महाअंतिम सोहळा 12 फेब्रिवारी रोजी रंगणार असुन चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. कलर्सने नुकतंच ट्रॉफीची झलक दाखवली आहे ज्यामध्ये दिसून येत आहे की, अतापर्यतच्या ट्रॉफीपेक्षा बिग बॉस 16 ची ट्रॉफी खूपच वेगळी दिसत आहे. यावेळी ट्रॉफीमध्ये एक युनिकॉर्न बनवण्यात आला आहे, जो चांदी आणि सोनेरी रंगाचा आहे. ही ट्रॉफी कोणाच्या हातात जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कट्टर वैरी असणारी शर्लिन चोपडाचे गुणगाण गातेय राखी सावंत; म्हणाली, ‘तिने मला खूप सपोर्ट…’
‘चक दे इंडिया’ची अजून एक अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, व्हायरल फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव

हे देखील वाचा