सेलिब्रिटी आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य मीडियाचा आणि त्यांच्या फॅन्सचं खूपच आवडता विषय असतो. सर्वांनाच त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडत असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील कोणतीही न्युज लगेच लक्षवेधून घेते. मागील बऱ्याच काळापासून ऋतिक रोशनची पहिली पत्नी सुजैन खान तिच्या रिलशनशिपच्या चर्चांमुळे सतत लाइमलाईट्मधे येत आहे. सुजैन खान आणि अभिनेता अर्सलान गोनी हे नात्यात असल्याचे कधीचे मीडियामध्ये येत आहेत. सुजैन खान कोरोना संक्रमित झाल्यानंतर तिने ज पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली, त्यावरून अर्सलानची कमेंट पाहून पुन्हा एकदा या चर्चा रंगायला सुरुवात झाली.
या सर्व चर्चा वाढल्यानंतर अभिनेता अर्सलान गोनीने मीडियासमोर येत या सर्व बातम्यांवर आणि त्यांच्या नात्यावर अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. जेव्हा अर्सलानला सुजैनसोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मला लाइमलाईट्मधे राहणे अजिबात आवडत नाही. मला या विषयावर बोलायला देखील अजिबात आवडत नाही. मात्र मी याबाबत अनेक बातम्या मागील बऱ्याच काळापासून ऐकत आहे. माझे अनेक मित्र मला फोन, मेसेज करून याबद्दल सतत विचारणा करत आहे. दोन लोकं शांततेत त्यांचे जीवन जगत आहेत तर यात समस्या काय आहे.”
पुढे अर्सलानला त्याने सुजैन खानच्या कोरोना संक्रमणाच्या पोस्टवरील कमेंटबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, “एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आहे हे समजल्यानंतर माझ्याकडून काय अपेक्षा केली जाते की, मी त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी. सुजैन नेहमीच माझ्या प्रार्थनेत असते. ती लवकर बरे व्हावे हीच माझी इच्छा आहे. लोकं सोशल मीडियावर काय बोलता काय विचार करता हे माझ्यासाठी महत्वाचे नाही. प्रत्येकाला बोलण्याचे, लिहिण्याचे स्वतंत्र आहे.” कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बॉलिवूडमधील बहुतांश सेलिब्रिटी कोरोनाने ग्रस्त आहे. सुजैन खान ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने संक्रमित झाली आहे.
हेही वाचा :