Saturday, June 29, 2024

नितीन देसाई यांच्या पार्थिवावर ‘या’ ठिकाणी होणार अंत्यसंस्कार; जाणुन घ्या सविस्तर माहिती

प्रसिद्ध मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन  देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. कर्जत येथील त्यांच्याच एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शन करणाऱ्या देसाईंनी अचानक आत्महत्येच टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.नितीन देसाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईतील जेजे रुग्णालयात करण्यात आले.

नितीन देसाई (Nitin Desai) यांनी एनडी स्टुडिओमध्ये आपले आयुष्य संपवलं. एन.डी स्टुडिओमध्ये शुक्रवारी (4 ऑगस्ट 2023 रोजी) संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. नितीन देसाई यांची मुलं अमेरिकेत असतात. ते मुंबईत आल्यानंतर देसाई यांना अखेरचा निरोप देण्यात येईल, अशी माहिती नितीन देसाईंचे जवळचे सहकारी नितीन कुलकर्णी यांनी दिली आहे.

नितीन देसाई यांनी अमिताभ बच्चन ते आमिर खानपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि 9 वेळा फिल्मफेअर पुरस्कार पटकावलेले नितीन देसाई हे बॉलिवूड स्टार्सच्या जवळ होते. अक्षय कुमारसोबत त्यांची मैत्री खूप घट्ट होती. त्याच्या अंतिम दर्शनासाठी बॉलीवूडचे सर्व स्टार्स पोहोचतील असे मानले जात आहे.

नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस आता सर्व बाजूंचा तपास करत आहेत. ज्या खोलीत गळफास घेतला त्या खोलीची पाहणी केली. त्या दरम्यान पोलिसांना नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली कोणतीही चिट्ठी सापडली नाही, पण त्यांना काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स सापडली आहेत. ऑडिओ क्लिपही सापडली असून त्यात काही लोकांचा उल्लेख आहे. नितीन देसाई यांनी कुठल्यातरी दबावाखाली आत्महत्या केली नसल्याचा पोलिसांचा संशय आहे.(art director nitin deasi suicide. furnel at nd studio on Friday.)

हेही वाचा-
देसाईंच्या निधनानंतर मनसे नेत्याचे धक्कादायक विधान! म्हणाले, ‘शूटिंग रद्द केल्या जायच्या…’ 
भीम गीतांचा आवाज हरपला; शिंदे कुटुंबातील प्रसिद्ध गायकाचं निधन

हे देखील वाचा