प्रसिद्ध मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. कर्जत येथील त्यांच्याच एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी त्यांचं जीवन संपवलं. आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शन करणाऱ्या देसाईंनी अचानक आत्महत्येच टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी काही व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानतंर आता त्यांनी ज्या ठिकाणी गळफास घेतला त्या ठिकाणी दोरीच्या साहाय्यानं एक धनुष्यबाण काढल्याची माहितीही समोर येत आहे. आता या सर्व गोष्टींची गंभीर दखल घेतली जात आहे.
प्रत्यक्षदर्शी मयूर डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देसाई (Nitin Desai) यांनी त्यांच्या स्टुडिओतील एका कामगाराला व्हॉईस नोट पाठवली होती. त्याने व्हॉईस नोटमध्ये काय बोलले हे उघड केले. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या शेवटच्या व्हॉईस नोटमध्ये काय होते? आर्ट डायरेक्टरच्या स्टुडिओसाठी कंत्राटी तत्त्वावर काम करणारा प्रत्यक्षदर्शी मयूर डोंगरे म्हणाला, “नितीन दादांनी सांगितले तू सकाळी 8.30 वाजता ये, माझ्या ऑफिसमध्ये एक रेकॉर्डर असेल, त्यात मी जे रेकॉर्ड केलं आहे ते तू चेक कर, असा मेसेज दिला होता”. आम्ही जेव्हा आत गेलो, तेव्हा त्यांच्या सुरक्षारक्षकांना कोणतीही कल्पना नव्हती. आम्ही सुरक्षारक्षकांना विचारलं की दादा कुठे आहेत? त्यावेळी सुरक्षारक्षकांना दादा तिथे नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आम्ही शोधाशोध केली आणि त्यावेळी दादांना आम्ही गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. ते फार भयानक दृश्य होतं.
आम्हाला तो रेकॉर्डर सापडला. आम्ही ती पूर्ण रेकॉर्डिंग ऐकली नाही. तो रेकॉर्डर पोलिसांच्या स्वाधीन केला. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाचे जिथे सेटअप झालं होतं, तिथेच त्यांनी आत्महत्या केली. नितीन दादांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात त्यांनी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी माझा अंत्यविधी 6 नंबरचा ग्राऊंड आहे, तिथे हॅलिपॅड आहे, त्या ठिकाणी व्हावा, अशी इच्छा सांगितली होती.नितीन दादांनी ज्या ठिकाणी गळफास घेतला, त्या ठिकाणी एक रस्सी होती, त्या रस्सीला त्यांनी धनुष्यबाणाचा आकार दिला होता आणि बाणाचं टोक ज्या दिशेने होतं, त्या ठिकाणीच त्यांनी आत्महत्या केली. आम्ही पहिल्यांदा जेव्हा तिथे गेलो, तेव्हा आम्ही तो धनुष्यबाण पाहिला. त्यानंतर आम्ही कामगारांना विचारले त्यांनी तो धनुष्यबाण बनवला आहे का? त्यावेळी त्यांनी हे आम्ही बनवलेलं नाही.असे सांगितले , हे दादांनीच बनवलं असावं, असं ते सांगत आहेत”, असेही तो कर्मचारी म्हणाला.
खालापूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे घटनास्थळी पोहोचले. सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना घार्गे म्हणाले, “आम्हाला कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा मृतदेह त्यांच्या स्टुडिओत लटकलेला आढळून आला आहे. यांनी घटनास्थळावरून जाताना सांगितले की, “आम्ही मोबाईल फोन आणि सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत, आम्ही ते फॉरेन्सिकसाठी पाठवले आहेत, आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. आम्ही केअरटेकर, ड्रायव्हर आणि कर्मचारी यांचे जबाब घेतले आहेत. आम्ही सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहोत. सविस्तर चौकशी केली जाईल.(art director nitin desai left a voice note before his death says eyewitness)
हेही वाचा-
देसाईंच्या निधनानंतर मनसे नेत्याचे धक्कादायक विधान! म्हणाले, ‘शूटिंग रद्द केल्या जायच्या…’
भीम गीतांचा आवाज हरपला; शिंदे कुटुंबातील प्रसिद्ध गायकाचं निधन