टेलिव्हीजन अभिनेत्री असलेली आरती सिंग आता पुन्हा एकदा मालिकांमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. चार वर्षांनी आरती ‘श्रावणी’ या मालिकेत अभिनय करताना दिसणार आहे. आरतीने अनेक मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या होत्या, मात्र तिला खरी ओळख बिग बॉसमुळे मिळाली. बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. आज आरती टीव्ही इंडस्ट्रीमधला ओळखीचा चेहरा असला तरी तिच्यासाठी हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. अभिनेता गोविंदाची पुतणी असलेल्या आरतीला या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. नुकतेच तिने माध्यमांशी बोलताना याबद्दल सांगितले.
आरती एका मोठ्या अभिनेत्याशी संबंधित असूनही तिला इथे अपेक्षित काम मिळाले नाही. तिला काम मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. घरी बाहेर सर्वच ठिकाणी तिला लोकं कमी लेखायचे. याबद्दल ती म्हणाली, “खरं सांगायचे तर माझा संघर्ष मानसिक पातळीवरचा होता. याचे कारण होते माझ्या कुटुंबातील लोकं. माझ्या घरात अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरे असल्यामुळे मला जास्त संघर्ष करावा लागला.”
पुढे आरती म्हन्ली, “माझ्या घरातील त्या सर्व प्रसिद्ध लोकांशी जुळवून घेण्यासाठी मला त्रास झाला. अनेकदा तर फॅमिली फोटो काढताना मला बाजूला होण्यास सांगितले जायचे. रागिणी खन्ना आणि कृष्णा त्यांच्या कामात व्यस्त होते, तेव्हा मला जास्त वाईट वाटायचे. मी खूप जास्त काळ या संघर्षाचा सामना केला. ज्या गोष्टींचा सामना मी करत होते, त्यांनीच मला खूप प्रेरणा दिली. यात मला माझ्या कुटुंबाने खूप पाठिंबा दिला आणि माझा संघर्ष वाया नाही गेला.”
दरम्यान आरती सिंग या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. ती पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. तिला ही भूमिका साकारताना टेन्शन आले आहे. कारण नकारात्मक भूमिकेत लोकांनी स्वीकारणे महत्वाचे आहे. आणि एका सारख्या भूमिका करण्यापेक्षा काहीतरी वेगळे नक्कीच केले पाहिजे असे देखील ती म्हणाली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुःखद! यश चोप्रा यांच्या पत्नी आणि जेष्ठ गायिका पामेला चोप्रा यांचे निधन
बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसवर आणि निर्मात्यांच्या घरी इनकम टॅक्स विभागाची छापेमारी