Thursday, January 30, 2025
Home मराठी थेट मृत्यूशी झुंज दिलेले लढवय्ये कलाकार, काहींच्या जगण्याची तर चाहत्यांनी अपेक्षाच सोडली होती !

थेट मृत्यूशी झुंज दिलेले लढवय्ये कलाकार, काहींच्या जगण्याची तर चाहत्यांनी अपेक्षाच सोडली होती !

‘स्वर्गाला हात लावून येणे’ अशा आशयाची आपल्याकडे एक म्हण आहे. काही कलाकारांच्या बाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत जुळते. सिने क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अगदी जवळून मृत्यूचे दर्शन घेतले आहे.

काहीच दिवसांपूर्वी ‘आशिकी’ फेम अभिनेता राहुल रॉय याला ब्रेनस्ट्रोक आल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले. काश्मीरमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी त्याला अचानक त्रास झाला. आता राहुलची प्रकृती ठीक असून तो उपचाराला प्रतिसाद देत आहे.

मात्र, मनोरंजन क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्याच्या जीवावर आलेल्या संकटाशी दोन हात करत विजय मिळवला आहे. या लेखात आपण अशाच काही कलाकारांची नवे बघणार आहोत

१. संजय दत्त :

संजय दत्त म्हणजे बॉलीवूडमधील मोठे प्रस्थ आहे. संजय त्याच्या चित्रपटांइतकाच वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील प्रसिद्ध आहे. याच संजय दत्तला यावर्षी ऑगस्ट महिन्यात फुप्फुसांचा चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्याचे समोर आले आणि एकच खळबळ उडाली. संजयने त्वरित कॅन्सरवर उपचार सुरु केले आणि ऑक्टोबर २०२० मध्ये म्हणजे केवळ २ महिन्यातच त्याने तो कॅन्सर मुक्त झाल्याचे जाहीर केले.

sanjay dutt
sanjay dutt

२. हेमा मालिनी :

बॉलीवूडची ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या सोबत देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. राजस्थानच्या दौसा भागात त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांना गंभीर इजा झाली. हा अपघात इतका मोठं होता की यात त्यांच्या डोळ्याला जबर मार लागला. थोडक्यात त्यांचा डोळा वाचला होता.

३. जायरा वासिम :

‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायरा वासिमचा देखील २०१७ मध्ये अपघात झाला होता. ती आणि तिचे मित्रमंडळी कुठे जात असताना त्यांची गाडी एका तलावात जाऊन पडली. तिथल्या स्थानिक लोकांनी हा अपघात बघून लगेच त्यांना मदत केली. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने ही घटना घडली.

४. अमिताभ बच्चन :

महानायक अमिताभ बच्चन यानंतर मृत्यूला पराभूत करून पुनर्जन्म घेतला आहे. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ या सिनेमाच्या चित्रकारणावेळी बंगलोरला एका ऍक्शन सीनचे चित्रीकरण करताना ते गंभीररीत्या जखमी झाले. बंगलोरला त्याच्यवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. तिथून त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात हलवले जवळपास ६३ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.

Amitab Bacchan
Amitab Bacchan

५. ऋतिक रोशन :

‘गॉड ऑफ ग्रीक’ म्हणून प्रसिद्ध असणारा हँडसम हंक ऋतिक रोशनला सुद्धा एका मोठ्या सर्जरीचा सामना करावा लागला. २०१२ साली आलेल्या ‘बँग बँग’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी त्याच्या डोक्याला जोरात मार बसला. त्यावेळी त्याने चित्रीकरण संपवण्यासाठी पेनकिलर खाल्या मात्र त्याने त्याचा त्रास जास्त वाढला. शेवटी डोक्यचे ऑपरेशन करावे लागले.

६. मनीषा कोईराला :

सन २०१२ साली मनीषाला गर्भाशयाचा कॅन्सर झाला. त्याच्या उपचारासाठी तिने थेट अमेरिका गाठले. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर अखेर २०१५ ला ती कॅन्सर मुक्त झाली आणि तिने ‘संजू’ सिनेमातून कमबॅक केले.

७. लिजा रे :

सन २००९ साली लिजाला पांढऱ्या पेशींचा कॅन्सर झाला. २०१० ला ती कॅन्सर मुक्त झाली. उपचारादरम्यान तिने कामातून ब्रेक घेतला नाही. आताच लिजा ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ या वेबसिरीजमध्ये दिसली.

Lisa Ray
Lisa Ray
author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा