Wednesday, June 26, 2024

तब्बल ३६ वर्षांनी पुन्हा एकदा सोबत दिसणार रामायण गाजवणारी ‘राम सीते’ची सुपरहिट जोडी

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवली. या मालिकेसोबत मालिकेत काम करणाऱ्या सर्वच लहान मोठ्या कलाकरांना अमाप लोकप्रियता लाभली. आज अनेक वर्षांनंतरही या मालिकेची आणि यात काम करणाऱ्या कलाकारांची क्रेझ प्रेक्षकांच्या मनावर आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा ही मालिका पुन्हा दाखवली गेली तेव्हा सुद्धा मालिकेने रेकॉर्डब्रेक लोकांचे प्रेम मिळवले. इंटरनेटवर आजही ही मालिका मोठ्या आवडीने पाहिली जाते.

रामानंद सागर यांच्या रामायणामध्ये अभिनेत्री दीपिका चिखलीया आणि अभिनेते अरुण गोविल यांनी राम आणि सीता ही भूमिका साकारली होती. या दोघं कलाकारांनी त्यांची भूमिका इतक्या उत्तम पद्धतीने साकारली की, ती अजरामर झाली. त्यांना प्रत्यक्षात देखील देव म्हणून संबोधले जायचे आणि त्यांची पूजा केली जायची. लोकांसाठी त्या काली आणि आजही ते राम आणि सीताच होते किंबहुना आहेत. या भूमिकेने त्यांना खूप काही दिले. सोशल मंदिर अरुणजी आणि दीपिकाजी दोघेही सक्रिय आहेत. त्यांना पुन्हा एकदा एकत्र बघण्यासाठी सर्वच लोकं आतुर होते. मात्र आता लवकरच ही आतुरता संपणार असून हे दोघं एका प्रोजेक्टसाठी पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dipika (@dipikachikhliatopiwala)

रामानंद सागर यांचे १९८७ साली आलेले रामायण संपले आणि त्यानंतर अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया यांना एकत्र पुन्हा बघण्याची इच्छा अनेकदा प्रेक्षकांनी बोलून दाखवली होती. नुकतेच दीपिकाजी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केले आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हाला देखील आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ सेटवरचा एक बिहाइंड द सीन्स व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका यांनी अतिशय साधा लूक केला आहे. ज्यात त्यांनी साधी साडी, भांगेत कुंकू लावले असून अतिशय सुंदर त्या दिसत आहे, तर दुसऱ्या क्षणी त्या अरुण गोविल यांच्यासोबत त्यांच्या सीनबद्दल बोलत आहे.

त्यांच्या या व्हिडिओवर नेटकाऱ्यानी कमेंट्स करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. सोबतच ते नक्की कसली शूटिंग कर्त्या आणि कधी ते पुन्हा सोबत स्क्रीनवर पाहायला मिळतील असे प्रश्न देखील विचारले आहे. काहीही तर त्यांना या दोघांना पुन्हा एकत्र पाहून हायसे वाटले असल्याचे देखील सांगितले आहे. मात्र दीपिका यांनी हा व्हिडिओ नक्की कोणत्या सेटवरचा आहे हे स्पष्ट केले नाही. आशा करू की लवकरच याचे देखील उत्तर मिळेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं….,’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा सून शिवानी रांगोळे हिला मजेशीर सल्ला
2 वर्षात 100 ट्यून बनवल्या, पण 9 च सिलेक्ट झाल्या; चित्रपटातील गाणी आणि नृत्याने रचला इतिहास

हे देखील वाचा