Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

OMG! अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटात, पुन्हा एकदा राम अवतार धारण करणार राम गोविल

रामानंद सागर यांच्या रामायणात भगवान रामची भूमिका साकारून ३४ वर्षांपूर्वी घरोघरी लोकप्रिय झालेले अभिनेता अरुण गोविल, पुन्हा एकदा त्याच पात्रामध्ये दिसणार आहेत. मात्र, यावेळी ते टीव्हीवर नाही, तर मोठ्या पडद्यावर राम बनणार आहेत. होय, अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये अरुण गोविल प्रभू श्री रामची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

‘या’ चित्रपटात दिसणार अरुण गोविल
अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी अरुण गोविल पुन्हा एकदा भगवान रामचे रूप घेणार असल्याचे वृत्त आले आहे. ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाची निर्मिती अश्विन वर्दे आणि अक्षय कुमार करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय करणार आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, अक्षय कुमारला अरुण गोविलने या चित्रपटात भगवान रामची भूमिका साकारावी अशी इच्छा होती. भगवान रामच्या भूमिकेसाठी अरुणपेक्षा अधिक परिचित दुसरा चेहरा नाही. निर्मात्यांनी मिळून हा निर्णय घेतला. ‘ओह माय गॉड २’ चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमही असतील.

 ‘अशी’ असेल चित्रपटाची कथा
पहिला चित्रपट धार्मिक कट्टरता आणि अंधश्रद्धेवर आधारित असताना, दुसरा भाग भारतीय शिक्षण व्यवस्थेवर आधारित असेल. चित्रपटाच्या शूटिंगसाठी क्रू १३ ऑक्टोबर रोजी उज्जैनला रवाना होणार होता, परंतु क्रूचे तीन सदस्य कोव्हिड -१९ पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शूटिंगची तारीख २३ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

अरुण गोविलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांना १९७७ मध्ये ताराचंद बडजात्या यांच्या ‘पहेली’ या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला. त्यांनी ‘सावन को आने दो’ (१९७९), ‘सांच को आँच नही’ (१९७९) आणि ‘इतनी सी बात’ (१९८३), ‘हिम्मतवाला’ (१९८६), ‘दिलवाला’ (१९९५), ‘हथकडी’ (१९९५) आणि ‘लव कुश’ (१९९७) आणि विक्रम बेताल, ‘लव कुश’ (१९८९), ‘कैसे कहून’ (२००१), ‘बुद्धा’ (१९९६), ‘अपराजिता’, ‘वो हुआ ना हमारे’ असे अनेक बॉलिवूड चित्रपट आणि ‘प्यार की कश्ती में ‘सारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारच्या आगामी ‘गोरखा’ चि्त्रपटाच्या पोस्टरवर चुकीचे हत्यार पाहून भडकले माजी सैन्य अधिकारी; म्हणाले…

-अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सूर्यवंशी ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये करणार धमाका

-आनंद एल राय यांच्या ‘रक्षा बंधन’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण, अक्षय कुमारने शेअर केली भावुक पोस्ट

हे देखील वाचा