आज संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाचा आनंद घेताना दिसत आहेत. सगळेजण देश भक्तीमध्ये बुडालेले दिसत आहेत. तसेच टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो इंडियन आयडल देखील याच मुहूर्तावर विजेता घोषित करून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या शोच्या फिनालेची सुरुवात रविवारी (१५ ऑगस्ट ) दुपारी १२ वाजल्यापासून झाली आहे. या दिमाखदार सोहळ्यात स्पर्धकांचे परफॉर्मन्स वागण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार आले आहेत. या एपिसोडमध्ये एका पेक्षा एक सरस परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे.
‘इंडियन आयडल १२’ च्या ट्रॉफीसाठी ६ स्पर्धक एकमेकांसमोर आहेत. प्रेक्षक देखील या शोचा विजेता कोण होईल हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. यातच या शोमधील लोकप्रिय स्पर्धक अरुणिता कांजीलाल हिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या एक चाहत्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (arunita kanjilal’s throw back video viral on social media )
शोच्या फिनाले एपिसोडच्या सुरुवातीला अरुणिताचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अरुणिता खूपच गोड दिसत आहे. यावेळी अरुणिता केवळ ११ वर्षाची होती.
या व्हायरल व्हिडिओमध्ये अरुणिता ‘मेरा साया’ हे गाताना दिसत आहे. एवढ्या लहान वयात तिचा हा आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करणारा आहे. यावेळी तिचा आवाज ऐकून सगळे परीक्षक खूप खुश झालेले दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये अरुणिता हे देखील सांगते की, तिने आठ वर्षाची असताना गाणे गायला सुरुवात केली होती. तिने सांगितले की, ती सकाळी उठून आधी रियाज करायची आणि मग शाळेत जायची. या सीझनमध्ये पवनदीप आणि अरुणिताचे खूप कौतुक झाले आहे. तसेच आता अरुणिताच्या चाहत्यांना अशी आशा आहे की, हा शो तीच जिंकणार आहे.
इंडियन आयडलच्या ट्रॉफीसोबत विजेत्याला काही रक्कम देखील मिळणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार विजेत्याला २५ लाख रुपये मिळणार आहे. तसेच एका म्युझिक कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट देखील मिळणार आहे. तसेच फायनॅलिस्टला लंडनमधील एका स्टेडियममध्ये परफॉर्म करायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-स्वातंत्र्यदिनाचा उत्साह परदेशातही! अमेरिकन व्यक्तीने ‘चक दे इंडिया’ गाण्यावर केला भन्नाट डान्स