Saturday, July 6, 2024

अरविंद अकेला कल्लूच्या होळी स्पेशल ‘जीजा तोहर बल्ले बल्ले’ गाण्याचा धमाका, प्रदर्शित होताच झाले सुपरहिट

बिहार आणि युपीमधील होळी भोजपुरी गाण्यांशिवाय अपूर्ण आहे. होळी जवळ यायला सुरुवात झाली की, भोजपुरीमध्ये विविध होळीचे गाणे प्रदर्शित होण्यास सुरुवात होते. या गाण्यांबद्दल प्रेक्षकांना देखील भरपूर उत्सुकता असते. आता होळीचा सण म्हटल्यावर अरविंद अकेला कल्लू त्याचे होळी गाणे प्रदर्शित होणार नाही असे होईल का? अशातच आता अरविंद अकेला कल्लूचे होळी स्पेशल गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात अरविंद अभिनेत्री झोया खानसोबत रोमान्स करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र याच गाण्याची तुफान चर्चा होताना दिसत आहे.

अरविंद अकेला कल्लूचे हे नवीन गाणे ‘जीजा तोहर बल्ले बल्ले’ असून याचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्यात त्याची नक्कीच बल्ले बल्ले होताना दिसत असून, तो त्याची ऑनस्क्रीन साली असणाऱ्या झोया खानसोबत रोमान्स करताना दिसत आहे. हे गाणे यूटुबवरील एसआरके म्युझिक या अधिकृत चॅनेलवरून प्रदर्शित करण्यात आले आहे. गाणे तुफान हिट झाले असून, गाण्यात दिसणारी जीजा आणि सालीची केमिस्ट्री सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. दोघांचा डान्स आणि एक्सप्रेशन लोकांना खूपच आवडत आहे.

हे गाणे प्रदर्शित होतच गाण्याला ५० हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहे. या गाण्याला भोजपुरी इंडस्ट्रीमधील अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या शिल्पी राजने आपला आवाज दिला आहे. तर अरविंद कल्लूने देखील या गाण्याला त्याचा आवाज दिला आहे. या गाण्याला लोकं यूटुबवर आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. यावर्षीच्या होळीचा आनंद अधिक वाढवण्यासाठी नक्कीच हे गाणे महत्वाचे ठरणार असल्याची भावना प्रेक्षकांमध्ये आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री

कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…

हे देखील वाचा