नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी रात्री उशिरा (२ ऑक्टोबर) कॉर्डेला द इम्प्रेस या क्रूझ शिपवर छापा टाकला. तिथे नुकतीच रेव्ह पार्टी सुरू झाली होती. या रेव्ह पार्टीसाठी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये बॉलिवूडच्या सुपरस्टारचा मुलगा असल्याचे समोर आले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दीर्घ चौकशीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि इतर आरोपींना अटक केली.
त्याचबरोबर न्यायालयाने आरोपींची एक दिवसाची कोठडीही एनसीबीला दिली. खरं तर, छाप्यापूर्वी एनसीबीला कळाले होते की, क्रूझ शिपवर अंमली पदार्थाची पार्टी होणार आहे. त्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांनी शिपची तिकिटे खरेदी केली आणि तेथे प्रवास केला आणि वाटेतच आरोपींना पकडले.
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेव्ह पार्टी दरम्यान सुमारे १३०० ते १४०० लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु एनसीबी हजारोच्या गर्दीत त्या ८ ते १० लोकांना शोधत होते, ज्यांची माहिती त्यांना मिळाली होती. त्यात आर्यन खानचे नाव अगदी स्पष्ट होते. विशेष म्हणजे, आर्यन आणि अरबाज मर्चंटवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र एनसीबी अधिकारी नेमण्यात आले होते.
आर्यन खानच्या नावाने क्रूझ शिपवर एकही खोली बुक केली गेली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. परंतु आयोजकाने आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसाठी खास कॉम्प्लिमेंटरी रूम ठेवली होती. दोघेही त्या खास कॉम्प्लिमेंटरी खोलीत जाऊ लागताच अचानक एनसीबीचे अधिकारी दोघांच्या समोर आले आणि दोघांना आत जाण्यापासून थांबवले. जेव्हा दोघांचा तपास करण्यात आला, तेव्हा आर्यन खानकडे काहीही सापडले नाही. परंतु अरबाज मर्चंटच्या बूटांमध्ये चरस सापडले.
यानंतर, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांचेही मोबाईल जप्त केले. त्यांच्या तपासादरम्यान काही चॅट्सही समोर आले. ज्यात दोघे चरस घेण्याविषयी बोलत होते. एनसीबीने आर्यनचे वक्तव्यही रेकॉर्ड केले आहे. ज्यामध्ये त्याने एजन्सीच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीला हे देखील कळाले आहे की, आर्यन खान आणि अरबाज मर्चंट हा अंमली पदार्थ पॅडलरच्या सतत संपर्कात होता, ज्यांना एनसीबी बराच काळ शोधत आहेत.
एनसीबीच्या हाती आणखी एक यश
या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या एनसीबीला आणखी एक यश मिळाले आहे. तपास यंत्रणेने रविवारी रात्री उशिरा मुंबईत आणखी एका अंमली पदार्थ पॅडलरला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात आहे. एजन्सी सोमवारी या प्रकरणाशी संबंधित अनेक खुलासे करू शकते. या प्रकरणात आणखी अनेकांना अटक होऊ शकते. एनसीबीचे मुंबई युनिटचे प्रमुख समीर वानखेडे म्हणाले, “अनेक पैलूंचा अजून शोध घेणे बाकी आहे आणि अनेक गोष्टींवर काम सुरू आहे. या प्रकरणात आम्ही आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक केली आहे. यापैकी तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांना सोमवारी हजर करण्यात येणार आहे.”
अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने एक रात्र एनसीबीच्या ताब्यात घालवली. मुंबईतील न्यायालयाने आर्यनसह तीन आरोपींना एका दिवसासाठी एनसीबीच्या कोठडीत पाठवले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला
-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ
-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…