Wednesday, July 3, 2024

तब्बल दोन वर्षांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सोशल मीडियावर झाला सक्रिय, स्वतःचा फोटो शेअर करत म्हणाला…

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील खास दिवस, सणसमारंभ साजरे करताना सुहाना आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत कायमच प्रकाशझोतात येते. परंतु शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सुहाना पेक्षा थोडा विरुद्ध आहे. आर्यन खान अगदी क्वचित क्षणांसाठी सोशल मीडियावर सक्रिय दिसतो. आर्यनने रविवारी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

तब्बल दोन वर्षांनी आर्यन खानने आपला फोटो शेअर केल्याने तो नेटकऱ्यांच्या चांगलाच चर्चेत आला आहे. आर्यनच्या या फोटोवर लाईक्स मोठा वर्षाव होत असून, असंख्य कमेंट्स देखील येत आहेत. त्याने या फोटोमध्ये लाल रंगाचे टीशर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. या फोटोमध्ये आर्यन खूप हँडसम आणि स्मार्ट दिसत असून त्याच्यावर कौतुकाच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड मधील मोठ मोठ्या कलाकारांपासून ते त्याच्या चाहत्यांपर्यंत सर्वच जणं आर्यन खानच्या या फोटोची स्तुती करत आहेत. आर्यनने आपला फोटो शेअर करताना लिहिले, “अनिवार्य पोस्ट करणे विसरून जा. मला असे वाटते की उशीरा का होईना पण येणे चांगलेच.” (aryan khan became active again on social media after two years)

आर्यनचा हा फोटो पाहून त्याच्या अनेक चाहत्यांना तर शाहरुख खानची आठवण येत आहे. तुम्ही सुद्धा जर हा फोटो नीट पहिला तर तुम्हालाही या फोटोमध्ये शाहरुखचा भास नक्कीच होईल. आर्यनचा हा फोटो पाहून अनेकांना ‘बाजीगर’ चित्रपटातील शाहरुख खानची आठवण झाली. या चित्रपटात शाहरुखच्या लुकशी थोडा मिळता जुळता लूक आर्यनचा फोटोत दिसत असल्याने देखील त्याच्या या फोटोला जास्तीत जास्त पसंती मिळत आहे.

हँडसम स्टार किड्सच्या यादीत आर्यन खानचा नेहमीच वरचा नंबर लागतो. सोशल मीडियावर त्याला १.४ मिलियन फॉलोवर्स आहेत. आर्यन कायमच आपल्या अभ्यासामध्ये व्यस्त असतो त्यामुळे तो सोशल मीडियावर फारच क्वचित दिसतो. आर्यनने १२ सप्टेंबर २०१९ ला त्याची शेवटची पोस्ट शेअर केली होती, त्यानंतर आता तब्बल दोन वर्षांनी तो सोशल मीडियावर परतला आहे. आर्यनने अजून अभिनयात पदार्पण केले नसले, तरी त्याने ‘लायन किंग’ या चित्रपटातील ‘सिम्बा’ या भूमिकेला आवाज दिला आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘या’ कारणांमुळे नक्कीच पाहा अजय देवगणचा वायूदलाचे शौर्य सांगणारा ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’

परिणीती चोप्राला प्रचंड आवडतो सैफ अली खान; म्हणाली, ‘…मी लगेच हो म्हणू शकते’

बॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांना लाभलीय लष्करी पार्श्वभूमी; सुष्मितापासून ते प्रियांकापर्यंत ‘यांचा’ आहे समावेश

 

हे देखील वाचा