Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड “शाहरुखपेक्षा आर्यन व्यस्त…” आपल्या पुस्तक प्रकाशनाला अनुपस्थित असणाऱ्या मुलाबद्दल गौरीचे ‘ते’ व्यक्तव्य चर्चेत

“शाहरुखपेक्षा आर्यन व्यस्त…” आपल्या पुस्तक प्रकाशनाला अनुपस्थित असणाऱ्या मुलाबद्दल गौरीचे ‘ते’ व्यक्तव्य चर्चेत

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडी म्हणून शाहरुख खान आणि गौरी खान यांना ओळखले जाते. शाहरुख आणि गौरीने त्यांचा मोठा फॅन बेस तयार केला आहे. अनेक संकटांवर मात करत ते आज यशस्वी झाले आहे. शाहरुख बॉलिवूड सुपरस्टार तर गौरीने देखील स्वतःची एक वेगळी ओळख जपली आहे. गौरी एक मोठी इंटिरियर डिझायनर आहे. नेहमीच स्वतःची एक वेगळी ओळख जपणाऱ्या गौरीने तिचे एक कोफी टेबल बुक लाँच केले आहे. या पुस्तकामधून खान कुटुंबाशी संबंधित आणि माहित नसलेले अनेक चांगले वाईट किस्से आपल्याला वाचायला मिळणार आहेत.

गौरीने प्रकाशित केलेल्या तिच्या ‘माय लाइफ इन अ डिजाइन’ या पुस्तकातून तिचा इंटिरियर डिझानिंगचा प्रवास उलगडणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला गौरीने मीडियाशी चर्चा करताना अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी तिने तिच्या कुटुंबाशी संबंधित अनेक पोलखोल देखील केल्या. या प्रकाशनाला गौरीचे पूर्ण कुटुंब उपस्थित होते, मात्र आर्यन खान नव्हता. यावेळी तिने आर्यन का उपस्थित नाही यावर उत्तरं देताना सांगितले की, “माझ्या या पुस्तकातील मला आवडणारी आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या कुटुंबाचा फोटो आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी मला शाहरुखची तारीख मिळवणे तसे सोपे गेले. पण माझ्यासाठी आर्यनच्या तारखा मिळवणे अवघड होते. तो सध्या त्याच्या कामात खूपच व्यस्त आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान गौरी खानच्या या नवीन ‘माय लाइफ इन अ डिजाइन’ पुस्तकात गौरीच्या प्रवासासोबतच त्याच्या घराच्या अर्थात ‘मन्नत’च्या आतील अनेक फोटो पाहायला मिळणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! लोकप्रिय गायिकेची आत्महत्या, हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

बॉलिवूडनंतर ‘हा’ मराठमोळा अभिनेता साऊथ इंडस्ट्री गाजवण्यासाठी सज्ज! पोस्टमधून दिली पहिल्या दाक्षिणात्य सिनेमाची माहिती

हे देखील वाचा