Monday, February 2, 2026
Home बॉलीवूड घरी येऊन २४ तासांच्या आतच आर्यनने उचललं ‘हे’ पाऊल; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘असं का केलं?’

घरी येऊन २४ तासांच्या आतच आर्यनने उचललं ‘हे’ पाऊल; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘असं का केलं?’

एकूण २७ दिवस तुरुंगात काढल्यानंतर, आर्यन खान अखेर आपल्या आलिशान बंगल्यात पोहोचला आहे. मुलाला पाहून वडील शाहरुख खान आणि आई गौरी खान खूप खुश झाले आहेत. आर्यन खानला अं’मली पदार्थ प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर, तो शनिवारी (३० ऑक्टोबर) आर्थर रोड जेलमधून घरी पोहोचला. तेव्हा किंग खानच्या फॅन्ससह त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे जंगी स्वागत केले. घरी पोहोचल्यानंतर २४ तासांच्या आतच आर्यनने एक मोठा निर्णय घेतला, जे पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

शाहरुख खान आणि गौरी खान गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मुलासाठी खूप चिंतेत होते. शक्य तितक्या प्रयत्नांनंतरही त्यांचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी कमी करणे त्यांना कठीण जात होते. तारखेवर तारखा मिळत होत्या, पण मुलगा जामिनावर तुरुंगातून बाहेर येऊ शकत नव्हता. दोन जामीन रद्द झाल्यानंतर तिसर्‍यांदा जामीन मिळवण्यात आर्यनला यश आले आणि घरी परतताना त्याचेही डोळे भावनांनी भरून आलेले पाहायला मिळाले. (aryan khan changed his instagram dp)

उचलले मोठे पाऊल
आर्यन खानने घरी आल्यानंतर मोठे पाऊल उचलले आहे. त्याने त्याचे इंस्टाग्राम अकाऊंटचा डीपी बदलला आहे. त्याने त्याच्या प्रोफाईलवरून त्याचा फोटो काढून टाकला आहे. डीपीमध्ये आता फोटोऐवजी पांढरे बॅकग्राऊंड दिसत आहे. यासोबतच त्याच्या काही जुन्या पोस्टही दिसत नाहीत. त्याने असे का केले, असा विचार नेटकरी करत आहेत.

Photo Courtesy: Instagram/___aryan___

कैद्यांना दिले मदतीचे आश्वासन
माध्यमातील वृत्तानुसार, आर्यन खान तीन आठवड्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर, त्याची बॅरेकमधील काही कैद्यांशी चांगली ओळख झाली आहे. आर्यन खाननेही या कैद्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच कैद्यांवर सुरू असलेल्या खटल्यांमध्येही मदत करण्याबद्दल तो बोलला आहे. शिवाय आर्यनने तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी इतर कैद्यांची भेट घेतली आणि त्यांना मिठी मारली.

सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार किंग खान
आता आर्यन आपल्या कुटुंबासोबत मन्नतमध्ये वेळ घालवत आहे. आर्यन घरी आला त्या दिवशी, चाहत्यांनी मन्नतच्या बाहेर फटाके, ड्रम आणि बॅनरसह त्याचे भव्य स्वागत केले. दरम्यान, समोर आलेल्या नवीन माहितीनुसार, मुलगा आर्यन घरी परतल्याच्या आनंदात शाहरुख खान लवकरच सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी भाग्यवान आहे की माझी मुले..’, आर्यन खान प्रकरणावर शत्रुघ्न सिन्हांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

-काय सांगता! जामीन तर मिळणार, परंतु न्यायालयाने आर्यनसमोर ठेवल्या ‘या’ एकूण ११ अटी

-हीच ती वकिलांची टीम ज्यांनी आर्यनला मिळवून दिला जामीन, जाणून घ्या या टीममधील सदस्यांबद्दल

हे देखील वाचा