Tuesday, July 9, 2024

आर्यन खान अजून दोन दिवस राहणार तुरुंगात, जामीन अर्जावर १३ ऑक्टोबरला होणार सुनावणी

सध्या संपूर्ण देशात आर्यन खान खूपच गाजत आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर होणाऱ्या रेव्ह पार्टीवर छापेमारी करुन नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खानचा मुलगा असणाऱ्या आर्यन खानला अटक केली. त्यानंतर त्याची कसून चौकशी देखील झाली. यादरम्यान आर्यनला जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांनी कोर्टात अर्ज केला होता. मात्र त्याचा जमीन कोर्टाने फेटाळत त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात केली.

त्यानंतर पुन्हा आर्यनला जामीन मिळावा यासाठी त्याचे वकील असणाऱ्या सतीश मानशिंदे यांनी कोर्टात अर्ज केला. त्यावर आज ११ ऑक्टोबरला सुनावणी दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने या जामीन अर्जावर १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच त्याला अजून पुढील दोन दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे. आर्यनचे वकील असणाऱ्या सतीश मानेशिंदे यांनी ९ ऑक्टोबरला विशेष एनडीपीएस न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणीच्या वेळेस कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. ११ ऑक्टोबरच्या सुनावणीला आर्यनच्या बाजूने बोलण्यासाठी वकील अमित देसाई उपस्थित होते. वकील अमित देसाई यांनीच सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणात त्याची बाजू मांडली होती.

या आदेशावर बोलताना आर्यनचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले की, ” कोर्टात जामीन याचिका फेटाळली जावी, हे खूपच स्वाभाविक आहे. आम्ही याविरुद्ध उच्च न्यायालयात जाऊ. आम्ही मुंबईच्या विशेष एनडीपीएस कोर्टात जामीन याचिका दाखल केली आहे. आर्यनजवळ कोणत्याही प्रकारचे अं’मली पदार्थ सापडले नाही आणि त्याची आरोपींसोबत कोणताच असा प्लॅन नव्हता. शिवाय आर्यनने ड्रग्ज घेतले याचे कोणतेच पुरावे सापडले नाही.”

एनसीबीने ९ ऑक्टोबर रोजी आर्यन ज्या गाडीने क्रूझवर पार्टीसाठी गेला होता त्या गाडीच्या ड्रायव्हरची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मान्य केले की, आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला त्याने क्रूझ टर्मिनलवर सोडले होते. ड्रायव्हरने एनसीबीला सांगितले आहे की आर्यन खान, अरबाज मर्चंट, प्रतीक गाबा आणि अन्य एक व्यक्ती आर्यनचा बंगला मन्नत येथून एकत्र मर्सिडीज कारमधून निघाले होते.

तत्पूर्वी आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी त्याचा मित्र अरबाज मर्चंटसह मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ शिपवरून एनसीबीने ताब्यात घेतले होते. एनसीबीला आर्यनकडून कोणतेही ड्रग्ज मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र आर्यनने चौकशीदरम्यान ड्रग्जचे सेवन करत असल्याची कबुली दिली होती. ८ ऑक्टोबरपासून आर्यन आर्थर रोड जेलमध्ये आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा