Saturday, July 6, 2024

आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी, बेल मिळेल की पुन्हा कोठडी?

मुंबई क्रूझ अं’मली पदार्थ प्रकरणात अटक केलेल्या शाहरुख खानच्या मुलाची जामीनाबाबत मुंबई हायकोर्टात मंगळवारी (२६ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. मागच्या वेळेस आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याचिका दाखल केली होती. परंतु यावर त्वरित सुनावणी करण्यासाठी कोर्टाने नकार दर्शवला होता. या सुनावणीसाठी कोर्टाने त्यांना २६ ऑक्टोबर ही तारीख दिली होती.

कोर्ट मंगळवारी (२६ ऑक्टोबर) फॅशन मॉडेल मुनमुन धमेचाच्या जामीनावर सुनावणी करणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी आर्यनची देखील जामीनाबाबत सुनावणी होती, परंतु कोर्टाने तेव्हा ही याचिका फेटाळून लावली होती. तेव्हा कोर्टाने सांगितले होते की, “पहिल्याच नजरेत समजत आहे की, तो अं’मली पदार्थांचे नियमितपणे सेवन करतो. तसेच असे सांगितले की, त्याच्या चॅटिंगवरून असे लक्षात येत आहे की, तो अं’मली पदार्थांचे देवाण-घेवाण करणाऱ्या लोकांशी संपर्कात आहे.” तेव्हा कोर्टात अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन फेटाळला होता. (Aryan khan drug case, bell plea hearing today in Bombay High court)

रविवारी (३ ऑक्टोबर) आर्यनला अटक करण्यात आले आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर शनिवारी (२ ऑक्टोबर) एका क्रूझ शिपमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकजण सहभागी होते. अशातच येथे रात्री पोलिसांची धाड पडली. पोलिसांना तेथे काही अं’मली पदार्थ सापडले. या सर्वांमध्ये शाहरुख खानच्या मुलाला देखील एनसीबीने ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत आणखी आठ जणांना देखील अटक करण्यात आले आहे. तसेच आर्यनचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

याच संदर्भात अभिनेत्री अनन्या पांडेसोबत आर्यनची चॅटिंग समोर आल्याने, तिला देखील मागच्या आठवड्यात दोन वेळा एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. या संदर्भात आता पुढील काय घडणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुख-गौरीच्या लग्नाच्या ३०व्या वाढदिवशी ‘या’ व्यक्तीने घेतली आर्यनची जेलमध्ये भेट

-आर्यन खानचा आणखी एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल, प्रकरणात ‘या’ व्यक्तीची रंगलीय चर्चा

-आर्यन खान प्रकरण: समीर वानखेडेंनी मागितले ८ कोटी रुपये? साक्षीदाराचा मोठा आरोप

हे देखील वाचा