Monday, July 1, 2024

आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरण आणि रिया चक्रवर्ती प्रकरण जोडणारा ‘हा’ आहे सारखाच दुवा

बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थांच्या सेवन केल्यामुळे अनेक कलाकारांची चौकशी झाली आहे. अनेकांना अटक देखील करण्यात आले होते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर या प्रकरणाने खूप वेग घेतला आणि एका पाठोपाठ अनेक कलाकारांची नावे समोर आली. अशातच बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे नावसुद्धा अंमली पदार्थांच्या सेवन प्रकरणात आले आहे.

आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरण आणि रिया चक्रवर्ती यांचे खास कनेक्शन आहे. या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याला जामीन देण्याची जबाबदारी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी घेतली आहे. हे तेच वकील आहेत, ज्यांनी सुशांत सिंग केसमध्ये रिया चक्रवर्तीची केस लढली होती. यावेळी त्यांनी रियाला जेलमधून बाहेर काढले होते. आता आर्यनच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत की, ते आर्यनला देखील या प्रकरणातून बाहेर काढतील. (Aryan Khan drug case handled by Rhea Chakraborty lawyer satish maneshinde)

सतीश मानशिंदे यांनी १९९३ साली संजय दत्त याची देखील केस लढली होती. त्यांनी त्याला देखील जामीन मिळवून दिला होता. तसेच २००२ साली सलमान खानला ‘हिट अँड रन’ प्रकरणात देखील सतीश मानशिंदे यांनीच त्याची सुटका केली होती. यासोबतच त्यांनी अनेक मोठमोठ्या हायप्रोफाइल केस लढवल्या आहेत.

रविवारी (३ ऑक्टोबर) आर्यनला अटक करण्यात आले आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर शनिवारी (२ ऑक्टोबर) एका क्रूज शिपमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकजण सहभागी होते. अशातच येथे रात्री पोलिसांची धाड पडली. पोलिसांना तेथे काही अंमली पदार्थ सापडले. या सर्वांमध्ये शाहरुख खानच्या मुलाला देखील एनसीबीने ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत आणखी आठ जणांना देखील अटक करण्यात आली असून, यांमध्ये आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांचा देखील समावेश आहे. आर्यनला एक दिवस एनसीबी कोठडीत देखील ठेवले होते. शिवाय त्याची जे. जे. हॉस्पिटलमध्ये मेडिकल चेकअप देखील झाले. हाती आलेल्या माहितीनुसार शाहरुख खानचे आर्यनसोबत फोनवर बोलणं झालं आहे.

मात्र आता कोर्टाने आर्यन आणि त्याच्या मित्रांच्या पोलीस कोठडीत वाढ करत त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत कस्टडी दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा