बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने रविवारी (३ऑक्टोबर) अंमली पदार्थाच्या पार्टी प्रकरणात अटक केली आहे. अटक केल्यानंतर आर्यनला न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला एक दिवसासाठी एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर काही बॉलिवूड कलाकार गप्प आहेत, तर काही शाहरुख खानचे समर्थन करताना दिसत आहेत. आर्यनच्या अटकेनंतर प्रथम अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली. यानंतर रात्री उशिरा सलमान खानही शाहरुख खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला होता. बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींनी शाहरुखला सोशल मीडियाद्वारे पाठिंबा दिला आहे. तर आता लोकप्रिय अभिनेते राजपाल यादव यांनीही या प्रकरणावर आपले मत मांडले आहे.
नुकत्याच मीडियाशी झालेल्या एका संभाषणात राजपाल यादव यांना विचारण्यात आले की, “शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने अटक केली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आजकालची मुलं का वाईट मार्गाला चालली आहेत.” यावर उत्तर देत राजपाल म्हणाले की, “ही माझ्यासाठी पण चकित करणारी बातमी आहे. मला एवढंच वाटतं की, देव प्रत्येकाला बुद्धी देवो आणि प्रत्येकाने चांगल्या मार्गावर जावे. प्रत्येकाच्या मुलांनी योग्य मार्गाचा अवलंब करावा हीच प्रार्थना. बाकी मला या प्रकरणाबद्दल जास्त काही माहिती नाही.” (aryan khan drug case rajpal yadav statement goes viral check out the video)
सुनील शेट्टीनेही केला होता बचाव
सुनील शेट्टी म्हणाला आहे की, “जेव्हा एखाद्या ठिकाणी रेड पडते, तेव्हा तेथे बरेच लोक असतात. अशा स्थितीत आपण हे का मानतो की, मुलाने अमली पदार्थाचे सेवन केले आहे. त्या मुलाला श्वास घेण्याची तरी जागा द्या. आपल्या इंडस्ट्रीमध्ये काहीही झाले की, मीडिया पूर्णपणे तुटून पडते.” याशिवाय, सलमान खान स्वतः त्याला भेटण्यासाठी शाहरुख खानच्या घरी पोहोचला होता.
आर्यन खानला एनसीबीने रविवारी मुंबईहून गोव्याच्या क्रूझवर रेव्ह पार्टीच्या संदर्भात १५ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. या प्रकरणी एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन व्यतिरिक्त, मुनमुन धामेचा आणि अरबाज सेठ मर्चंट यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना एक दिवसाच्या रिमांडवर एनसीबीच्या ताब्यात दिले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला
-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ
-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…