Monday, July 1, 2024

आर्यन खानकडून जामीनासाठी पुन्हा अर्ज! कोर्टात लवकरच सुनावणी, वकिल मानेशिंदेंचा मोठा इशारा

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईजवळील समुद्रातील एका क्रुजवर छापा टाकला होता. यावेळी अं’मली पदार्थ सेवन आणि जवळ बाळगणे या प्रकरणी शाहरुख खान पुत्र, आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. दिनांक ३ ऑक्टोबरपासून अटकेत असलेल्या आर्यनला अगोदर एनसीबीची कोठडी आणि त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे आता आर्यनने जामीनासाठी अर्ज केला आहे.

आर्यन खान याने वकिल सतीश मानेशिंदे यांच्यामार्फतही जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्याला जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर आज (11 ऑक्टोबर) आर्यनने पुन्हा जामीनासाठी अर्ज केला आहे. सेशन कोर्टातील न्यायाधीश वीवी पाटील यांच्यासमोर या जामीन अर्जावर सकाळी साधारण 11 वाजता सुनावणी होईल. यापूर्वी जामीन नाकारलेल्या आर्यनला आज तरी जामीन मिळणार की नाही, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

आर्यन खान याचे वकिल सतीश मानेशिंदे आणि एनसीबीच्या वकिलांमध्ये आज नेमका काय युक्तिवाद होणार, हे देखील पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. आर्यनकडे कोणतेही अं’मली पदार्थ आढळले नसून, या प्रकरणातील आरोपींसोबत त्याचे कोणतेही संबंध नसल्याचे वकिल सतीश मानेशिंदे हे न्यायालयाला आर्जवणार यात कोणतीही शंका नाही. तसेच यावेळी न्यायालयाने जामीन नाकारल्यास आपण थेट उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही सतीश मानेशिंदे यांनी म्हटलं आहे. मात्र, एनसीबीची आजची भुमिका आर्यनच्या जामीनासाठी कितपत अडथळे आणणार हे देखील पहावे लागेल.

हेही वाचा —

आर्यनच्या अडचणीत वाढ; जामीन फेटाळल्यानंतर एनसीबी अधिकारी म्हणाले, ‘या निर्णयाने आरोप करणाऱ्यांची बोलती बंद’

आर्यननंतर आता त्याच्या ड्रायव्हरची चौकशी सुरू, संशय केला जातोय व्यक्त

आर्यनमुळे शाहरूख खानला पहिला झटका! ‘या’ बड्या कंपनीकडून जाहिराती रोखण्याचा निर्णय

हे देखील वाचा