बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अं’मली पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी एनसीबीने अटक केली होती. अलीकडेच, एनसीबीने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचासह ११ जणांना मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीवर छापेमारीदरम्यान अटक केली होती. यानंतर गुरुवारी (०८ ऑक्टोबर) त्याचबरोबर, शाहरुख खानलाही त्याच्या मुलाचे नाव अं’मली पदार्थ प्रकरणात आल्यानंतर आर्थिक फटका बसत आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, टीचिंग ॲप बायजूस आगाऊ बुकिंग असूनही शाहरुख खानसोबतचा करार संपवणार आहे. सध्या त्याच्या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली आहे. असे मानले जाते की, या निर्णयामागे सोशल मीडिया ट्रोलर्स जबाबदार आहेत. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखला खूप ट्रोल केले जात आहे.
माध्यमांतील वृत्तामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, बायजूच्या प्रवक्त्याने या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. शाहरुखच्या चाहत्यांसह अनेक सोशल मीडिया युजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत. टीव्ही अभिनेता नकुल मेहतानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. नकुल मेहताने शाहरुखचा बायजूसचा करार संपुष्टात आणण्यावर टीका केली.
इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्याने ट्विटरवर लिहिले की, “त्याच्या जागी एक सेवारत मंत्र्याला बदलले जात आहे. ज्यांच्या मुलाला हत्येसाठी अटक करण्यात आली आहे! क्लास बायजूस.” नकुल मेहताचे हे ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या या ट्वीटवर अभिनेता आणि शाहरुखचे चाहते आपली प्रतिक्रिया देत आहेत.
Being replaced by the serving minister who's son is arrested for murder charges! Class, Byju's ???? https://t.co/YLoMQrzbOe
— Nakuul Mehta (@NakuulMehta) October 9, 2021
सध्या हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझमधून एकूण १४ लोकांना ताब्यात घेण्यात आले. उर्वरित सहा जणांना चौकशीनंतर सोडण्यात आले. अटक केलेल्या आठ जणांच्या चौकशीच्या आधारावर, एनसीबीने मुंबईत अं’मली पदार्थांच्या व्यवहाराशी संबंधित आणखी काही लोकांना अटक केली आहे. एनसीबीने शनिवारी (०९ ऑक्टोबर) शिवाजी रामदास नावाच्या अं’मली पदार्थ विक्रेत्यालाही अटक केली आहे. आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकूण लोकांची संख्या १९ झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘आपल्याला लाज वाटायला पाहिजे’, शारीरिक अत्याचार प्रकरणावर भूमी पेडणेकरने केला संताप व्यक्त