शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब सध्या अं’मली पदार्थ प्रकरणात मुलगा आर्यन खानच्या अटकेमुळे कठीण परिस्थितीतून जात आहे. २३ वर्षीय आर्यन खानला एनसीबीने क्रूझवर अं’मली पदार्थ छाप्यात ताब्यात घेतले आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आर्यनच्या बॅगेत काहीही सापडले नसले, तरीही त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. आर्यनच्या अटकेमुळे शाहरुखची जाहिरात बंद करण्यात आली आहे. इतकेच नाही, तर शाहरुखसारखा दिसणारा राजू रहिकवार देखील या प्रकरणामुळे अडचणींना सामोरे जात आहे.
शाहरुखसारखा हुबेहूब चेहरा असल्याने राजू रहिकवार देशभरात प्रसिद्ध आहे. तो अनेक कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होत राहतो. मात्र, जेव्हापासून अं’मली पदार्थ प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आले आहे, तेव्हापासून राजूला आर्थिक फटका बसत आहे. त्याला कोणतेही काम मिळत नाही. एवढेच नाही, तर अं’मली पदार्थ प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आल्यानंतर ज्या कार्यक्रमांमध्ये राजू सहभागी होणार होता, ते कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
राजू माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, “सुमारे दीड वर्षे कोरोना विषाणूमुळे कोणताही कार्यक्रम झाला नाही, त्यामुळे कोणतेही काम सापडले नाही. या संसर्गानंतर थोडीशी सुरुवात झाली, मला वाटले की, आता काम सुरू होईल. अगदी अलीकडे, मला ऑक्टोबरमध्ये दोन शो करण्याची संधी मिळाली, पण आयोजकांनी रद्द केले आणि म्हणाले, लोक शाहरुखच्या सध्याच्या इमेजवर खूश नाहीत. काय चालले आहे, ते तुम्हाला माहिती आहे.”
राजू पुढे म्हणाला की, सध्या असे वातावरण आहे, पण शाहरुख खान या अडचणीतून बाहेर पडेल असा त्याचा विश्वास आहे. तो पुढे म्हणाला की, तो आपल्या मुलांची शालेय फी भरण्याची आशा करत होता, पण आता तो दुसरा पर्याय शोधत आहे. राजू म्हणाला, “मला त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. मी त्यांच्या कामासाठी त्याग करण्यास तयार आहे. माझी ओळख शाहरुख भाईमुळे आहे. आज माझ्याकडे जे काही आहे, ते त्याच्यामुळे आहे, म्हणून मी त्याच्यासारखा दिसतो. तो माझा देव आहे. सध्या त्याचे कुटुंब दुःखात आहे आणि मलाही असेच वाटू शकते की, आर्यन भाऊंनी घरी परत यावे.”
याशिवाय, राजूने आर्यन अं’मली पदार्थ प्रकरणामुळे स्वतःला येणाऱ्या इतर अडचणींबद्दल सांगितले आहे. २ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजातून अटक केली होती, जिथे रेव्ह पार्टी चालू होती. आर्यन खान व्यतिरिक्त त्याचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही एनसीबीने या छाप्यात अटक केली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आर्यन खानची रात्र कारागृहातच; सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला जामीन
-आर्यन खानच्या चिंतेत शाहरुख आणि गौरी झाले हतबल, त्याला सोडवण्यासाठी करताय शर्थीचे प्रयत्न
-इंग्रजीवरून आणि बॉडीशेमिंगवरून ट्रोल झालेली मोनालिसा नेहमीच करते ट्रोलर्सकडे दुर्लक्ष










