Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड काय सांगता! शाहरुख खानला भेटण्यासाठी मुलालाच घ्यावी लागते अपॉइंटमेंट, खुद्द आर्यननेच केला खुलासा

काय सांगता! शाहरुख खानला भेटण्यासाठी मुलालाच घ्यावी लागते अपॉइंटमेंट, खुद्द आर्यननेच केला खुलासा

अंमली पदार्थांच्या सेवनाच्या आरोपाखाली अटक झालेला आर्यन खान खूपच चर्चेत आला आहे. २ ऑक्टोबर रोजी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलासोबत अजून १२ लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. आर्यन ड्रग्स विक्रेत्यांच्या नियमित संपर्कात असल्याचे त्याच्या मोबाईलवरील चॅटवरून स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. सध्या आर्यन आणि त्याच्या साथीदारांना ७ तारखेपर्यंत एनसीबी कोठडी ठोकावण्यात आली आहे.

या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे. आता या प्रकरणात आर्यनच्या चौकशीदरम्यान एक धक्कादायक खुलासा झाला आहे. त्याला त्याच्या वडिलांना शाहरुख खानला भेटण्यासाठी वडिलांची मॅनेजर असणाऱ्या पूजाकडून अपॉइंटमेंट घ्यावी लागते. शाहरुख खान सध्या एकाचवेळी त्याच्या अनेक आगामी प्रोजेक्टवर काम करत आहे. त्यामुळे सध्या तो खूपच व्यस्त आहे. त्यामुळे त्याला त्याच्या मुलांना भेटण्यासाठी देखील अपॉइंटमेंट द्यावी लागते. वाचून आश्चर्य वाटले ना. मात्र हे खरे आहे. आर्यनने हे सर्व NCB ला सांगितले आहे.

प्राप्त माहितीनुसार, आर्यन खानने ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली दिली आहे, मात्र ड्रग्ज खरेदी केल्याचा त्याने इंकार केला आहे. आर्यन व्यतिरिक्त एनसीबीने अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सतिजा, इश्मीत चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा, विक्रांत छोकर आणि दोन ड्रग पॅडलर यांना ताब्यात घेतले आहेत.

एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये आर्यन मागील ४ वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत असल्याचे सत्य समोर आले आहे. त्याने भारताबाहेर यूके, दुबई आणि इतर काही देशांमध्ये ड्रग्ज सेवन केल्याचे कबूल केले आहे. प्राप्त माहितीनुसार, आर्यन खानला त्या क्रूझवरील पार्टीमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्यात आले होते. या पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नाही. एनसीबी करत असलेल्या चौकशीमध्ये आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्याच्या नावाचा वापर करत लोकांना आमंत्रण दिले असल्याचे सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-किंग खानच्या लाडक्या मुलाला ऋतिक रोशनच्या एक्स पत्नीचा पाठिंबा; म्हणाली, ‘तो चांगला मुलगा आहे…’

-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

हे देखील वाचा