Friday, July 5, 2024

जेव्हा गरीब मुलीला आर्यन खानने केली मदत, स्टारकिडचे मोठे मन पाहून युजर्सनेही केले होते कौतुक

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रविवारी (३ ऑक्टोबर) अंमली पदार्थांच्या सेवन प्रकरणात एनसीबीने अटक केले आहे. या प्रकरणात आर्यनचे नाव समोर आल्यावर त्याचे वडील शाहरुख खान याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान आर्यनसोबत अमली पदार्थांच्या सेवनाबद्दल बोलताना दिसत होता. यानंतर आता पुन्हा एकदा आर्यनचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे.

स्टारकिडचा हा सकारात्मक व्हिडिओ पाहून सगळेजण हैराण झाले आहेत. या व्हिडिओमध्ये आर्यन एका भीक मागणाऱ्या गरीब मुलीला मदत करताना दिसत होता. या व्हिडिओमध्ये आर्यन, मलायका अरोरा आणि त्यांचे मित्र एका हॉटेलमधून बाहेर येत असतात. जिथे त्यांना बघण्यासाठी त्यांचे चाहते जमलेले असतात. या गर्दीत एक लहान मुलगी आर्यनकडे मदत मागते. तेव्हा कोणताही विचार न करता तो त्या मुलीची मदत करतो. (Aryan Khan helping child beggar old video viral During he arrested in cruise drugs party)

आर्यनचा हा व्हिडिओ २०१८ मधील होता, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याच्या स्वभावाचे कौतुक केले होते. शाहरुख खान हा नेहमीच त्याच्या प्रेमळ आणि दयाळू स्वभावामुळे ओळखला जातो. कोरोना महामारी दरम्यान त्याने त्याचे ऑफिस कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दिले होते.

परंतु आता यावेळेस परिस्थिती काही वेगळी आहे. आर्यन आता अंमली पदार्थांचे सेवन केल्याच्या गुन्ह्यात अडकला आहे. अशातच त्याचा हा व्हिडिओ पाहून अनेकजण प्रश्न चिन्ह उभे करत आहेत. एकेकाळी या व्हिडिओमुळे त्याचे कौतुक करणारे, आज त्याच्या या व्हिडिओला फेटाळत आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ बकवास आहे असे सांगितले तर अनेकांना त्याची देहबोली आवडली नाही.

रविवारी (३ ऑक्टोबर) आर्यनला अटक करण्यात आले आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर शनिवारी (२ ऑक्टोबर) एका क्रूझ शिपमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकजण सहभागी होते. अशातच येथे रात्री एनसीबीची धाड पडली. एनसीबीला तेथे काही अंमली पदार्थ सापडले. या सर्वांमध्ये शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत आणखी आठ जणांना देखील अटक करण्यात आले आहे. तसेच आर्यनचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा