Tuesday, July 9, 2024

आर्यन खानचा आणखी एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल, प्रकरणात ‘या’ व्यक्तीची रंगलीय चर्चा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा क्रूझवर होणाऱ्या अंमली पदार्थ पार्टीत अडकल्यापासून याबद्दल सतत काही ना काही खुलासे होत आहेत. याबद्दल कोणीच काहीच सांगू शकत नाही, की येणाऱ्या दिवसांत आर्यन खान आणि त्याच्या मित्रांबरोबर काय होणार आहे. आता या प्रकरणाच्या संबंधित एका साक्षीदाराने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळेे प्रचंड खळबळ उडाली आहे.

या व्हिडिओमध्ये फरार साक्षीदार किरण गोसावी एनसीबी कार्यालयात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा एक ऑडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये हॉटेल व्यवसायिक कुणाल जानी देखील दुसऱ्या खुर्चीवर बसलेला दिसत आहे. अलीकडेच कुणाल जानीलाही अं’मली पदार्थांच्या दुसऱ्या प्रकरणात अटक केली होती.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एनसीबीच्या कार्यालयात काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये कुणाल जानी खुर्चीवर बसलेला आहे आणि आणखी एक व्यक्ती आर्यनचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. अशातच कुणाल एनसीबीच्या कार्यालयात दिसल्यामुळे आता अंदाज लावण्यास सुरुवात झाली आहे की, या महिन्याच्या सुरुवातीला क्रूझ शिपवर एनसीबीने टाकलेल्या छापेमारीत त्याचा काही संबंध होता का? ज्यामध्ये आर्यन खान आणि त्याच्या मित्रांना अटक झाली आहे.

एनसीबीच्या सुत्रांनुसार, कुणाल जानी एका वेगळ्या अं’मली पदार्थाच्या प्रकरणात अटक केली होती. जेव्हा आर्यन खानला तेथे नेण्यात आले, तेव्हा तो आधीच तेथे उपस्थित होता. कारण त्यावेळी त्याचा जबाब नोंदवला जात होता. एनसीबीच्या सुत्रांनी सांगितले की, कुणाल जानीचे नाव सुशांत सिंग राजपूत प्रकरणात समोर आले होते. त्यावेळी कुणाल जानीचे आणि रिया चक्रवर्तीचे अंमली पदार्थ संबंधित चॅट मिळाले होते. त्याचबरोबर कुणाल जानी शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राचा व्यावसायिक पार्टनर आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खान प्रकरण: समीर वानखेडेंनी मागितले ८ कोटी रुपये? साक्षीदाराचा मोठा आरोप

-आर्यन खान प्रकरणावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘संपूर्ण इंडस्ट्रीने मिळून कचरा…’

-‘आर्यन खान अं’मली पदार्थांचे सेवन करतो, हे माहितीये का?’, अनन्याला चौकशीदरम्यान एनसीबीने विचारले १२ प्रश्न

हे देखील वाचा