Saturday, July 6, 2024

तपासणी करतानाच अस्वस्थ झाला होता आर्यन खान, ‘यामुळे’ एनसीबी अधिकाऱ्यांना आला संशय

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांना अंमली पदार्थ प्रकरणी रविवारी (३ ऑक्टोबर) एनसीबीने अटक केली. शनिवारी जेव्हा क्रूझवर छापा टाकण्यात आला, तेव्हा तिथे रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. माध्यमांतील वृत्तानुसार, २३ वर्षीय आर्यन खान चरसचे सेवन करतो. या आरोपावर त्याला अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. एनसीबीने मोठ्या नियोजनाने हा छापा टाकला. अधिकाऱ्यांना या पार्टीबद्दल माहिती मिळताच, एक प्लॅन केला. पूर्ण मिशन या प्लॅननुसार राबवण्यात आले.

एनसीबीने तिकिटे बुक केली होती
क्रूझ रेव्ह पार्टीमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यनचे नाव आल्यानंतर हे प्रकरण प्रकाशझोतात आले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, एनसीबीशी संबंधित सूत्राने सांगितले की, एनसीबीचे ६ अधिकारी यासाठी तयार होते. यात शंका नाही की, तिकिटे ३ लॉटमध्ये ऑनलाइन बुक केली गेली. जर एनसीबीकडून अधिक अधिकारी आणता आले नाहीत. तर मध्य औद्योगिक छाप्या साठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) सोबत घेतले गेले असते. या छाप्यासाठी ठोस व्यवस्था होती. अधिकाऱ्यांनी मार्ग वगैरे तपासले होते आणि सोबत ६ बोटीही ठेवल्या होत्या.

तपासणी दरम्यान अस्वस्थ झाला आर्यन
मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून लोक पार्टीसाठी येऊ लागले. जेव्हा जास्त गेस्ट आले तेव्हा सीआयएसएफला ‘व्हीआयपी’ गेस्टसाठी मार्ग तयार करण्यास सांगितले गेले. त्यांची तपासणी केली जाईल, असे सीआयएसएफने सांगितले. यानंतर आर्यन खान आणि अरबाज मर्चंट व्हीआयपी गेस्ट म्हणून आत आले. त्यांचे आयडी कार्ड्सही तपासण्यात आले. त्याच्या सामानाचे आणि अरबाज मर्चंटच्या स्कॅनिंग सुरू होताच आर्यन घाबरून गेला. आर्यनच्या अस्वस्थतेमुळे एनसीबी सतर्क झाली. यानंतर शूजची कसून तपासणी करण्यात आली आणि शूजमध्ये अंमली पदार्थ सापडले. माध्यमांतील वृत्तानुसार, आर्यनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अरबाजसोबत सापडलेले चरस ते दोघेही घेणार होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा