गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खान न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. अं’मली पदार्थांप्रकरणी त्याला एनसीबीने अटक केल्यानंतर काही दिवस त्याला एनसीबी कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला नायायलायीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे सध्या तो आर्थर रोड जेलमध्ये आहे. अशात बुधवारी (१३ ऑक्टोबर) मुंबई न्यायालयात त्याच्यावर सुनावणी होणार होती, परंतु काही कारणास्तव सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली. गुरुवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीमध्ये आर्यनच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.
आर्यनचा जमीन अर्ज फेटाळत त्याला २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच आता त्याला इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक दिली जाणार आहे. तसेच त्याला जेलमधील जेवण दिले जाणार आहे. आर्यनला ‘एन९५६’ हा कैदी नंबर देण्यात आला आहे. तसेच त्याला सुरक्षेच्या कारणांमुळे इतर कैद्यांसोबत ठेवले जाईल. आर्यनला मनीऑर्डरमधून मिळणारे पैसे तो पिण्याच्या पाण्यासाठी आणि जेवण्यासाठी आवश्यकता अथवा गरज पडल्यास खर्च करू शकणार आहे.
Drugs on cruise matter | Mumbai Special NDPS court reserves order for 20th October on bail application of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha
— ANI (@ANI) October 14, 2021
मुंबई न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये एनसीबीकडून जो युक्तिवाद करण्यात आला, त्यामुळे आर्यनच्या आयुष्याला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. एनसीबीकडून सांगण्यात आले की, आर्यनने काही पहिल्यांदाच अं’मली पदार्थाचे सेवन केलेले नाही. त्याने याआधी देखील बऱ्याच वेळा अं’मली पदार्थ घेतलेले आहेत. तसेच अरबाज मर्चंटकडे अं’मली पदार्थ आहेत, हे आर्यनला आधीच माहिती होते. म्हणूनच तो त्या पार्टीमध्ये गेला होता. त्यामुळे या प्रकरणी आर्यनला किमान एक वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
शर्थीचे प्रयत्न करून देखील किंग खानला आपल्या मुलाला या प्रकरणातून बाहेर काढण्यात अपयश येत आहे. आता पुन्हा २० ऑक्टोबरपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने सर्वच बॉलिवूड कलाकार आर्यन खानविषयी चिंता व्यक्त करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ब्रेकिंग! आर्यनबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; २० ऑक्टोबरपर्यंत जेलमध्येच राहणार शाहरुखचा मुलगा