Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड समोर आला त्या क्रूझ पार्टीचा व्हिडिओ, जिथून करण्यात आलीय आर्यन खानला अटक; पाहा

समोर आला त्या क्रूझ पार्टीचा व्हिडिओ, जिथून करण्यात आलीय आर्यन खानला अटक; पाहा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी, (२ ऑक्टोबर) रात्री उशीरा मुंबईतील एका आलिशान क्रूझ शिपवर छापा टाकला. या क्रूझ शिपवर अंमली पदार्थ पार्टी चालली होती आणि ताब्यात घेतलेल्यांमध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आहे. रविवारी, एनसीबीने आर्यनसह तीन लोकांना अटक केली, आज या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होणार आहे, जिथे आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे त्याच्या जामिनासाठी अर्ज करतील. आर्यन व्यतिरिक्त, इतर ८ लोकांचीही चौकशी केली जात आहे, ज्यांची नावे एनसीबीने उघड केली नाहीत. आता या क्रूझमधील व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, क्रूझच्या आत प्रचंड गर्दी दिसत आहे. तेथे डान्स आणि गाणी सुरू आहे.

न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी, एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर दावा केला जात आहे की, हा त्या पार्टीचा व्हिडिओ आहे, जिथून शाहरुखचा मुलगा आर्यनला ताब्यात घेण्यात आले होते. माध्यमांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात बरेच लोक क्रूझवर पार्टी करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये वेगवेगळे मजले दिसत आहेत जिथे लोक गाणी आणि डान्सचा आनंद घेत आहेत.

एनसीबीला अशी माहिती मिळाली की, कॉर्डेला द इंप्रेस क्रूझवर काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी क्रूझवर पूर्णपणे तयारी केली आणि छापा टाकला. त्या पार्टीत सुमारे ६०० लोक उपस्थित होते. माध्यमांतील वृत्तानुसार, शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह ८ लोकांना ताब्यात घेण्यात आले, ज्यात ३ मुलींचा देखील समावेश आहे. ८ जणांना ताब्यात घेतल्यानंतर प्रत्येकाची चौकशी करण्यात आली आणि नंतर ३ जणांना अटक करण्यात आली. ज्यामध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा समावेश आहे. आता या प्रकरणाची सुनावणी सोमवारी दुपारी होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा