Sunday, April 20, 2025
Home बॉलीवूड खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

अखेर २७ व्या दिवशी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाला आहे. अं’मली पदार्थ प्रकरणात त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. अनेक प्रयत्न करूनही त्याला जामीन मिळत नव्हता. परंतु अखेर दोन दिवसांपूर्वी कोर्टाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. आर्थर रोड जेलमधून बाहेर आल्यावर आर्यन एका हॉटेलमध्ये गेला. तिथे तो त्याचे वडील शाहरुख खानला भेटला आणि तिथूनच ते दोघे मन्नतवर रवाना झाले. नुकताच आर्यन त्याच्या घरी पोहचला आहे. तेथील काही दृश्य समोर आली आहेत.

आर्यन नुकताच त्याच्या घरी पोहचला आहे. त्याच्या स्वागतासाठी त्याच्या घराबाहेर ढोल ताशांचा गजर चालू आहे. तसेच अनेकजण त्याला भेटण्यासाठी त्यांच्या घराबाहेर पोहचले आहेत. त्यांची ही गर्दी सांभाळायला तिथे काही पोलिस कर्मचारी देखील उपस्थित आहेत. जे ती गर्दी सांभाळून आर्यन खानच्या गाडीला पुढे जाण्यासाठी रस्ता देत आहेत. तसेच गाडी गेटमध्ये जाताच त्यांनी गेट लावून घेतला. तिथे अनेक मीडियावाले उपस्थित होते. परंतु कोणाशीही संवाद न साधता शाहरुख आणि आर्यन त्यांच्या घरी गेले आहेत. (Aryan khan reached at his home jannat, so many media persons and polise are surrounding him)

त्याला घरी सोडताना कोर्टाने त्याच्या समोर काही अटी ठेवल्या आहेत. त्याचे त्याला नियमितपणे पालन करावे लागणार आहे. त्याला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात दुपारी ११ ते २ च्या दरम्यान हजर राहावे लागणार आहे. तसेच त्याला परवानगीशिवाय मुंबई तसेच देश सोडून जाता येणार नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आर्यनचा पासपोर्ट जप्त केला आहे. तो सुटल्यानंतर खान कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील त्यांचा आनंद व्यक्त करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! आर्यन खान आर्थर रोड कारागृहातून बाहेर, लवकरच होणार मन्नतवर रवाना

-काय सांगता! जामीन तर मिळणार, परंतु न्यायालयाने आर्यनसमोर ठेवल्या ‘या’ एकूण ११ अटी

-हीच ती वकिलांची टीम ज्यांनी आर्यनला मिळवून दिला जामीन, जाणून घ्या या टीममधील सदस्यांबद्दल

हे देखील वाचा