Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड अं’मली पदार्थ प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर कोर्टात पोहोचला आर्यन खान, केली ‘या’ गोष्टीची मागणी

अं’मली पदार्थ प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर कोर्टात पोहोचला आर्यन खान, केली ‘या’ गोष्टीची मागणी

शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खानचा (Gauri Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला क्रूझ अंमली पदार्थ प्रकरणी जामीन मंजूर होऊन आणि क्लीन चिट मिळून अनेक महिने झाले आहेत. ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईतील क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानचे नाव घेतले होते. आता या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यन खानने कोर्टाकडे पासपोर्ट परत करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, आर्यन खानने आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. गुरुवार, ३० जून रोजी त्याचे वकील अमित देसाई आणि राहुल अग्रवाल यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली होती. अर्जात आर्यन खानने नमूद केले आहे की, त्याच्याकडे एनसीबीचे आरोपपत्र नाही, त्यामुळे त्याचा पासपोर्ट परत करण्यात यावा. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी १३ जुलै ही तारीखही निश्चित केली आहे. (aryan khan reached court for demanding passport)

मंजूर करण्यात आला होता सशर्त जामीन
आर्यन खानला कोर्टाने सशर्त जामीन दिला होती. त्यानुसार त्याला मुंबई किंवा देशाबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. यामुळे त्याला कोर्टात पासपोर्ट जमा करावा लागला. सुरुवातीचे काही महिने साप्ताहिक हजेरीसाठीही त्याला एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागली. आर्यन खानने मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये तीन आठवड्यांहून अधिक काळ घालवला, जिथे त्याचा वडील शाहरुख खान देखील त्याला भेटायला यायचा.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा