Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड भर गर्दीत ‘मन्नत’च्या बाहेर हनुमान चालीसाचा जप करताना दिसले पंडितजी, पाहा व्हिडिओ

भर गर्दीत ‘मन्नत’च्या बाहेर हनुमान चालीसाचा जप करताना दिसले पंडितजी, पाहा व्हिडिओ

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान २७ दिवसांनंतर, तुरुंगातून अखेर त्याच्या घरी ‘मन्नत’वर पोहोचला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते शाहरुख खानच्या घराबाहेर येऊन आर्यनच्या जामिनासाठी प्रार्थना करत होते. या प्रार्थनाही कामी आल्या आणि शनिवारी (३० ऑक्टोबर) आर्यन तुरुंगातून बाहेर पडला आणि घरी पोहोचला. आर्यनच्या स्वागतासाठी त्याच्या घराबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती.

हजारोंच्या या गर्दीत एका व्यक्तीने मात्र सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. मन्नतच्या बाहेर बसून एक पंडितजी सातत्याने हनुमान चालीसाचा जप करताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आर्यन घरी येण्यापूर्वी हे पंडितजी शाहरुख आणि आर्यन खानसाठी प्रार्थना करताना दिसले. (aryan khan released from jail one pandit chanting hanuman chalisa outside the mannat)

या व्यक्तिरिक्त सगळ्यांच्या नजरा आणखी एका माणसाकडे वेधल्या गेल्या, जो सोबत गाय घेऊन आला होता आणि शाहरुख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील ‘तुझे देखा तो’ गाणे वाजवत होता. दुसरीकडे, कारागृहाच्या बाहेरही मोठ्या संख्येने लोक आणि प्रसारमाध्यमांनी गर्दी केल्याने, मोठा पोलीस बंदोबस्त आणि बॅरिकेड्स लावण्यात आले होते.

गुरुवारी (२८ ऑक्टोबर) सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज मंजूर केला. आर्यनच्या कायदेशीर टीममध्ये मुकुल रोहतगी, सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांचा समावेश होता. माध्यमातील वृत्तानुसार, वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले होते की, “शाहरुख तुरुंगात असलेल्या आपल्या मुलाबद्दल खूप काळजीत होता. शाहरुख खानला जामीन मिळाल्याची बातमी कळताच त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.” अशामध्ये आता आर्यन घरी पोहचल्यामुळे मन्नतवर आनंदाचं वातावरण आहे. शिवाय मन्नतला एखाद्या वधूप्रमाणे सजवलं गेलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यनला जामीन मिळताच बहीण सुहाना न्यूयॉर्कहून लवकरच येणार मुंबईत; एकत्र साजरी करणार दिवाळी

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

-काय सांगता! जामीन तर मिळणार, परंतु न्यायालयाने आर्यनसमोर ठेवल्या ‘या’ एकूण ११ अटी

हे देखील वाचा