इंडियन प्रीमियर लीग २०२२ ला (IPL 2022) सुरुवात झाली असून, पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होता. यादरम्यान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) लाडका आर्यन खान (Aryan Khan) स्टेडियममध्ये त्याची टीम कोलकाता नाइट रायडर्सला प्रोत्साहन देताना दिसला. सामन्यादरम्यान आर्यनचे काही फोटोही समोर आले आहेत, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आर्यन खानसोबत एक सुंदर मुलगीही दिसली होती, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेटकरी आता या मिस्ट्री गर्लबद्दल प्रश्न विचारतानाही दिसत आहेत.
आर्यन खान हा बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आहे, त्यामुळे अनेकांना त्याच्यामध्ये शाहरुखची झलक दिसते. एक वेळ अशी होती, जेव्हा शाहरुख नेहमीच मैदानावर आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी हजर असायचा. पण कामात व्यस्त असल्यामुळे यावेळी तो सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे यावेळी त्याच्याऐवजी त्याचा मुलगा आर्यन खान त्याच्या टीमला सपोर्ट करताना दिसला. आर्यन काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये आपल्या टीमला चिअर अप करताना दिसला. तो त्याच्या मित्रांसोबत बोलतानाही दिसत होता. आर्यन खानही हसताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (aryan khan seen with mystery girl ipl 2022 kkr and csk match see viral photos)
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. चेन्नई सुपर किंग्जचा कोलकाता नाईट रायडर्सकडून ६ गडी राखून पराभव झाला. आज आयपीएलचा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात होणार आहे.
ऑक्टोबर २०२१ मध्ये आर्यन खानला त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांच्यासोबत अटक करण्यात आली होती. एनसीबीकडून एका क्रूझवर मारण्यात आलेल्या छाप्यामध्ये एका अं’मली पदार्थांच्या पार्टीचा पर्दाफार्श करण्यात आला होता. या छापेमारीचे नेतृत्व एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केले होते. २५ दिवस जेलमध्ये घालवून आर्यनला बॉम्बे कोर्टाने जामीन दिला. त्याचा जामीन आधी सत्र न्यायालयाने आणि नंतर एका विशेष एनडीपीएस कोर्टाने नाकारला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा