Saturday, June 29, 2024

जेलमध्ये असणाऱ्या आर्यन खानसोबत शाहरुख आणि गौरीने व्हिडिओ कॉल करून साधला संवाद

गुरुवारी (१४ ऑक्टोबर) मुंबई न्यायालयात आर्यन खानवर झालेल्या सुनावणीमध्ये त्याच्या पदरी पुन्हा अपयश आले आहे. यावेळी परत त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. पुढचे ५ दिवस म्हणजेच २० ऑक्टोबर पर्यंत त्याला आर्थर रोड जेलमध्ये काढावे लागणार आहेत. यासाठी त्याला कैदी नंबर देण्यात आला आहे. आर्यनचा कैदी नंबर एन ९५६ असून त्याला आता सामान्य कोठडीतच पाठवण्यात आले आहे.

कोरोना महामारीमुळे कोणताच कैदी त्याच्या कुटुंबियांना भेटू शकत नाही. तसेच वकिलांना देखील भेटण्यास कोणत्याही कैद्याला अनुमती देण्यात आलेली नाही. अशात आर्यनला देखील त्याची आई गौरी आणि बाबा शाहरुखला भेटता येणार नसल्याने त्याचे आई बाबांबरोबर व्हिडिओ कॉल मार्फत बोलणे झाले. जेलमधील कैद्यांना महिन्यातून ३ ते ४ वेळा आणि आठवड्यातून एकदाच व्हिडिओ कॉलवर बोलण्याची मुभा देण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार आर्यनचे गौरी खान आणि शाहरुख खानसोबत १० मिनिटे व्हिडिओ कॉल मार्फत बोलणे झाले. यावेळी खूप दिवसांनी आई बाबांबरोबर बोलत असल्याने तो भावुक झाला आणि रडू लागला. त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून गौरी आणि शाहरुखचे देखील डोळे पाणावले होते. जेलमध्ये कैद्यांना कुटुंबीयांशी बोलण्यासाठी फक्त ११ स्मार्टफोन आहेत. तसेच इथे आर्यनला फक्त ४५०० रुपये मनीऑर्डर मिळाली असून, या पैशांतून तो त्याच्या आवडीचे पदार्थ आणि वस्तू घेऊ शकणार आहे. आर्यनला आतापर्यंत जेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तेथून कॅन्टीन जवळ असल्याने तो तेथूनच बिस्किटे खाऊन दिवस काढत होता. परंतु आता सामान्य विभागात त्याला ठेवण्यात आल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये आर्यनला जामीन देऊ नये असे म्हणत एनसीबी कडून सांगण्यात आले की, “आर्यनने पहिल्यांदाच अं’मली पदार्थ घेतलेत असे नाही. तो गेली ४ वर्षे तो अं’मली पदार्थांचे सेवन करत आहे. त्याचे परदेशातील अं’मली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तींबरोबर संबंध आहेत. आम्हाला त्याच्या फोनमध्ये तसे चॅट सापडले आहे.”

Photo Courtesy: Instagram/gaurikhan

परंतु यावर आर्यनचे वकील अमित देसाई असे म्हणाले की, “आर्यनचा कोणाशीही कसलाच संबंध नाही. त्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा. त्याच्याकडे कोणतेही अं’मली पदार्थ सापडलेले नसताना देखील त्याला यामध्ये ओढले जात आहे. या प्रकरणी सर्व तरुण मुलं गुंतली गेली आहेत. त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा देखील त्यांना मिळाली आहे. त्यांना लवकरात लवकर जमीन द्यावा.”

शाहरुख खान मुलाला जामीन मिळावा यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. परंतु आर्यनच्या मार्गातील अडचणी वाढतच चालल्या आहेत. त्याला आता १ वर्षांची शिक्षा होणार अशी देखील चर्चा सुरू आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर

आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स

भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ऐकून नाचू लागतील चाहते

हे देखील वाचा