शनिवारी (०२ ऑक्टोबर) आर्यन खानला एनसीबीने एका क्रूझ शिपमधून ताब्यात घेतले. त्याने अं’मली पदार्थांचे सेवन केले असल्याने त्याला एनसीबी कोठडी ठोठावण्यात आली. त्यांनतर ७ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा त्याला एनसीबीच्या कोठडीत ठेवण्यात आले. या सर्वांमुळे शुक्रवारी (०८ ऑक्टोबर) आर्यनला जमीन मिळेल असे सर्वांना वाटत होते. मात्र, आता त्याच्या बाबत मोठी बातमी समोर येत आहे.
गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या आर्यन खानच्या अडचणींमध्ये आता पुन्हा वाढ झाली आहे. सतत जामिनाची याचिका दाखल करुन देखील आर्यनला न्यायालयाकडून दिलासा देण्यात आलेला नाही. शुक्रवारी पुन्हा एकदा न्यायालयात त्याला जामीन मिळेल, अशी आशा त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी व्यक्त केली होती. परंतु आता न्यायालयाने आर्यनचा आणि इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या दोघांना देखील आर्थर रोड कारागृहात पाठवले आहे.
सुनावणी वेळी सरकारी वकील म्हणाले की, “कीला मॅजिस्ट्रेट कोर्टाला अशा प्रकरणी जामीन अर्ज देण्याचा अधिकार नाही. आर्यनच्या फोनमध्ये सापडलेले चॅट हे अं’मली पदार्थांशी संबंधितच आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणातील आरोपींवर एकत्र कारवाई होणे गरजेचे आहे. यातील कोणालाही वेगळे करून चालणार नाही. कारण येथील सर्वच जण मोठ्या घराण्यातील आहेत आणि यांना जर जामिनावर सोडले, तर हे लोक साक्षीदारांना त्रास देण्याची शक्यता आहे.”
यावर सतीश मानेशिंदे आर्यनची बाजू मांडत म्हणाले की, “आर्यन इतर १७ आरोपींपैकी फक्त अरबाज मर्चंटलाच ओळखतो. तो जरी मोठ्या कुटुंबातला असला, तरीही तो पुराव्यांशी छेडछाड करेल, असे म्हणणे कितपत योग्य आहे.”
अनेक युक्तिवाद झाले, परंतु अखेर आर्यन खानला जामीन मिळाला नाही. आता त्याचे वकील पुढे सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज मागू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
आर्थर रोड जेलमध्ये पोहोचताच आर्यन झाला भयभीत
आर्थर रोड जेलमध्ये या आधी कसाब, अबू सालेम, संजय दत्त सारख्या व्यक्तींना ठेव्यात आले होते. त्यामुळे तेथील वातावरण पाहून तो अस्वस्थ झाला होता.
त्याच्याबरोबर आणखीन ५ कैद्यांना पहिले ५ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार आहे. इथे त्याला इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक दिली जाणार आहे. तो तुरुंगामध्ये पोहोचताच पुरुष कैद्यांना आर्थररोड कारागृहात आणि महिला कैद्यांना भायखळा कारागृहात पाठवण्यात आले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी
-आर्यनचे वकील मानेशिंदेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आर्यनला ‘ग्लॅमरचा तडका’ लावण्यासाठी…
-काय सांगता? ज्याने आर्यन खानला ‘धरलं’ तोच निघाला फरार आरोपी, क्रूझ प्रकरणात नवा ट्विस्ट










