Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘इतिहासात इतका खालचा टप्पा मी कधीच…’, ‘पठाण’ चित्रपटाच्या कॉन्ट्रवर्सीबद्दल स्पष्टच बोलल्या आशा पारेख

शाहरुख खान  स्टारर पठाण चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटामधील बेशरम रंग गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. दीपिका पादुकोण हिने गाण्यामध्ये भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्यामुळे हिंदु संघटना आणि भाजप पक्ष चित्रपटाला बॉयकॉच करण्याची मागणी करत आहेत. या चित्रपाटाला घेऊन सेन्सॉर बोर्डने पठाणमधील काही सीन बदलण्यास सांगितेल आहेत. या विषयावर बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांनी आपले मत व्यक्त केले आहेत.

आपल्या दमदार अभिनयाने आपला काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांनी नुकतंच एका मुलाखतीदरम्यान पठाण (Pathan) चित्रपटाच्या कॉन्ट्रवर्सी विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. आशा पारेख या माजी सेन्सॉर बोर्डाच्या प्रमुख होत्या, त्यांनी पूर्वी देखिल या वादावर स्पष्टच मत मांडलं होतं. यवेळी देखिल त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्याण सांगितेल की, “आमचा चित्रपट उद्योग एवढ्या वाईट टप्प्यातून कधीच गेला नाही. मी साठ वर्षांहून अधिक काळ या उद्योगात आहे. इतिहासात इतका खालचा टप्पा मी कधीच पाहिला नाही. ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग कोणत्याही अडथळ्याशिवाय मोकळा केला पाहिजे. यशराजसारख्या संस्थेला नुकतेच एकापाठोपाठ एक फटके बसत गेले आहेत. नवीन कोणता फटका त्यांना परवडू शकत नाही.”

आशा पारेख पुढे म्हणाल्या की, “पठाण’ चित्रपटाचं प्रदर्शन सुरळीत करायचे असल्यास त्यांनी हे गाणं काढून टाका. मी हे स्पष्टपणे सांगते, मी गुंडगिरीला पूर्णपणे विरोध करते. समाजातील काही घटकांनी देशासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे का ठरवावे? तुम्हाला चित्रपट पाहायचा नाही, पाहू नका. मला चित्रपट बघायचा आहे. मला का थांबवत आहात?”

 

View this post on Instagram

 

आशा पारेख या नेहमी परखडपणे बॉलिवूडबद्दल आपले मात मांडत असतात. त्यांनी पठाण चित्रपटाविषयी देखिल खूप चांगल्यापद्धतीने स्पष्टीकरण दिलं आहे. शिवाय बॉलिवूडमधील त्यांच्या योगदानाला सन्मानित करत त्यांना दादासाहेब पुरस्काराने सन्मानित केले आहे. पठाण हा चित्रपट (दि, 25 जानेवरी) रोजी चित्रपटाृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गुड लूक्स आणि पर्सनॅलिटी नसूनही इरफान खाननं गाजवलं बॉलिवूड
खोटं बोलून ऍडमिशन घेतलं अन् पुढं जाऊन सुपरस्टार बनला इरफान खान, वाचा अंगावर काटा आणणारी स्टोरी

हे देखील वाचा