Wednesday, July 3, 2024

‘ही हूकुमशाही आहे…’, ममता बॅनर्जींच्या ‘द केरळ स्टोरी’वर बंदी आणल्याच्या निर्णयावर अशोक पंडितचं संतापजनक वक्तव्य

द केरळ स्टोरी‘ रिलीज झाल्यापासून वादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटावरून सर्वत्र राजकारणही वाढत आहे. आतापर्यंत या चित्रपटाला दोन बाजू आहेत. काही प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत असून जोरदार प्रमोशन करत आहेत, तर काही लोक विरोध करत आहेत. अशात देशातील अनेक भागात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘द केरळ स्टोरी’वर बंदी घातली आहे. मात्र, चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ममता यांच्या निर्णयाचा निषेध केला आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

खरे तर, अलीकडेच ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी पत्रकार परिषद बोलावून ‘द केरळ स्टोरी’बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घातली आहे. राज्यात शांतता राखण्यासाठी चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

त्याचवेळी, नुकतेच चित्रपट निर्माते आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी पश्चिम बंगालमधील केरळ स्टोरीवरील बंदीचा निषेध केला आहे. अशोक यांनी सोमवारी (दि. 8 मे)ला ट्विटरवर दोन व्हिडिओही शेअर केले आहेत. एका क्लिपमध्ये, अभिनेते अमिताभ बच्चन काही महिन्यांपूर्वी राज्यातील एका कार्यक्रमात बोलले असल्याचा आहे, तर दुसऱ्या क्लिपमध्ये एका व्यक्तीने कोलकाता पोलिसांनी चित्रपटाचे प्रदर्शन कसे थांबवले याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

ही क्लिप शेअर करत अशोक पंडित यांनी लिहिले की, ‘आज हे त्याच बंगाल राज्यात घडत आहे, जिथे अमिताभ जी काही दिवसांपूर्वी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत होते. दुर्दैवाने आज एका चांगल्या चित्रपटावर त्याच मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर बंदी घातली आहे. ममता बॅनर्जींच्या या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी उद्योग जगत एकत्र येतील अशी माझी इच्छा आणि आशा आहे.’

अशोक पंडित पुढे म्हणाले, ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर पश्चिम बंगाल सरकारने घातलेल्या बंदीचा मी निषेध करतो. हा चित्रपट निर्मात्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील मोठा हल्ला आहे. त्यातून चुकीचा संदेश दिला जात आहे.'(ashoke pandit condemns mamata banerjee dictatorial attitude post Bollywood movie the kerala story ban in west bengal )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करियरच्या टॉपवर घेतलेले लग्नाचा निर्णय आणि अमेरिकेतील जीवनशैली, अश्विनी भावे यांनी सांगितला त्यांचा हा प्रवास

अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ कृतीमुळे अभिनेते मेहमूद झाले होते आपल्याच मानसपुत्रावर नाराज, स्वतःच केला होता खुलासा

हे देखील वाचा