Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड मोठी बातमी! अभिनेत्री रिचा चड्ढा विरोधात पोलिसात तक्रार

मोठी बातमी! अभिनेत्री रिचा चड्ढा विरोधात पोलिसात तक्रार

चित्रपट निर्माते अशाेक पंडित यांनी गुरूवारी ( दि. 24 नोव्हेंबर) ला ट्विटरवर माहिती दिली की, त्यांनी बॉलीवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा विरुद्ध भारतीय सैन्य आणि शहीदांची खिल्ली उडवणाऱ्या आक्रोशपूर्ण ट्विटबद्दल जुही पोलिस ठाण्यामध्ये पोलिस तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग करत, चित्रपट निर्मात्याने ट्विट केले की, “मी अभिनेत्री ऋचा चड्ढा (richa chadha) विरुद्ध जुहू पोलिस ठाण्यात मुंबई येथे पोलिस तक्रार दाखल केली. आमच्या सैनिकांची थट्टा करण्याचा अधिकार कोणाला नाही. मला आशा आहे की, मुबंई पाेलिस देशाच्या कायद्यानुसार तिच्यावर कारवाई करेल.”

अशोक पंडित, जे इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांनी जुहू पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या पोलिस तक्रारीची प्रत शेअर केली. तक्रारीत असे लिहिले आहे की, “रिचा चड्ढा हिने आमच्या सुरक्षा दलांची, विशेषत: ज्यांनी आमच्या शत्रूंशी लढताना गलवान खोऱ्यात आपले प्राण दिले त्यांची खिल्ली उडवली आहे आणि त्यांचा अपमान केला आहे.”

बॉलीवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिने बुधवारी, (23 नोव्हेंबर) ला ट्विटरवर भारतीय लष्कराची खिल्ली उडवली हाेती. मात्र, यानंतर ऋचा चढ्ढा हिने ट्विटरवर तिचा वकील सवीना बेदी सच्चर यांना टॅग करत माफी मागितली.

ऋचा म्हणाली, “विवादात ओढल्या गेलेल्या 3 शब्दांमुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर मी माफी मागते. माझ्या बाेलण्याचा असा काहीही हेतू नव्हता. फाैजेत माझे स्वत:चे नानाजी हाेते. लेफ्टनंट कर्नल म्हणून 1960 च्या भारत – चीन युद्धात त्यांच्या पायावर गाेळी झाडली हाेती.

https://twitter.com/ashokepandit/status/1595504602266624000?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1595504602266624000%7Ctwgr%5Eec7469f3d658f0dbce6422b92b41a7eb193a04ae%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fdainikbombabomb.wdxdwsffmw-eqg35gy284xn.p.temp-site.link%2Fwp-admin%2Fpost.php%3Fpost%3D130724action%3Dedit

रिचा हिने माफी मागितल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना अशोक पंडित यांनी माध्यमाशी बाेलताना सांगितले की, “अभिनेत्रीचे वर्तन लज्जास्पद आहे आणि अशा वर्तनाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तिला अटक करण्यात यावी.” (ashoke pandit files police complaint against bollywood actress richa chadha)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
झुंड चित्रपटातील ‘या’ कलाकाराला अटक, 5 लाख रुपयाचे दागिने चोरी केल्याचा आरोप

राखी सावंतने सांगितला होळीचा किस्सा, जेव्हा तिने फुगे समजून कंडोममध्ये भरले होते पाणी तेव्हा…

हे देखील वाचा