‘आश्रम’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘दिग्दर्शकाला माझ्या मांड्या आणि…’


बॉलिवूडमध्ये काम करताना कलाकरांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. यात सर्व अनुभव चांगलेच असतील असे बिल्कुल नाही. अनेक वाईट अनुभव देखील असतात. यातलाच एक घाणेरडा प्रकार म्हणजे कास्टिंग काऊच. बहुतकरून अभिनेत्रींसोबत होणार हा लैंगिक गैरवर्तनाचा विद्रुप चेहरा इंडस्ट्रीमध्ये अनेकदा पाहायला मिळतो. फक्त नवीनच नाही, तर जुन्या आणि अनेक मोठमोठ्या अभिनेत्रीसुद्धा या प्रकाराला सामोऱ्या गेल्या आहेत. हिंदी सिनेसृष्टीला लागलेल्या या किडीबद्दल अनेकदा अभिनेत्री मोठ्या हिमतीने समोर येऊन त्यांच्यासोबत झालेला प्रकार जगासमोर आणतात. ‘मी टू’ या मोहिमेचा जन्म देखील यातूनच झाला आहे. या मोहिमेमुळे अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे.

प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेबसीरिजमधून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे प्रीति सूद. प्रीतिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. यावेळी ती म्हणाली, “ऑडिशनमध्ये अनेकदा माझ्याबाबत अश्लील वक्तव्य केली जायची. मी जर त्याचा विरोध केला, तर मला तो रोल नाकारला जायचा. मात्र, यासाठी कारण देखील फारच विचित्र आणि हास्यास्पद दिली जायची. कधी तुम्ही खूप लहान आहात, तर कधी तुम्ही खूप मोठ्या. एका चित्रपटातून तर मला अगदी शेवटच्या मिनिटांमध्ये काढण्यात आले होते. कारण काय तर मी मुख्य अभिनेत्रीपेक्षा अधिक सुंदर दिसत होते.”

पुढे ती म्हणाली, “एकदा मी एका ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाली आणि दिग्दर्शकानं मला भेटण्यासाठी बोलावले. तिची व्यक्तिरेखा समजावून सांगण्यासाठी ती मीटिंग ठेवली गेली होती. पण दिग्दर्शक चित्रपटाबद्दल काहीच बोलत नव्हता. तो माझ्या कपड्यांबाबत सारखा मला प्रश्न विचारत होता. मी एक्स्पोज करणारे कपडे घालावे. शिवाय मी माझी मांडी आणि क्लिवेज दाखवावे अशी देखील मागणी त्याने माझ्याकडे केली. त्यानंतर मी तडक तेथून उठली आणि निघून गेली. हा अनुभव घेतल्यानंतर मी अतिशय विचारपूर्वक आणि सावधपणे ऑडिशन देते.”

यावेळी प्रीति हे देखील म्हणाली, “जसे या क्षेत्रात वाईट लोकं आहेत, तसे चांगले लोक देखील आहेत, ज्यांनी मला खूप चांगले मार्गदर्शन केले. आणि मला अनेक योग्य सल्ले देखील दिले.”

प्रीतिने आतापर्यंत ‘वेलकम टू कराची’, ‘फ्रॉड सैय्या’ आणि ‘रिव्हॉल्वर राणी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.