Wednesday, July 3, 2024

भारताच्या विजयानंतर संतोष जुवेकरचा राडा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

एशिया कप स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धेकांमध्ये खेळला गेला. रविवार (२८ ऑगस्ट) रोजी हा सामना खेळला गेला. ज्यामध्ये टिम इंडियाने पाकिस्तानला धुळ चारत हा सामना जिंकला. भारताने क्रिकेट सामना जिंकल्यानंतर देशभरात प्रचंड जल्लोश पाहायला मिळाला. देशभरातील क्रिकेटप्रेमींनी रस्त्यावर उतरत फटाके फोडत मोठा जल्लोश केला. यामध्येच मराठी अभिनेता संतोष जुवेकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये भारताच्या विजयानंतर तो जल्लोश करताना दिसत आहे. 

संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हा मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने मराठी सिनेसृष्टीत एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनया इतकाच तो सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो. सध्या संतोष जुवेकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये  भारताच्या विजयानंतर तो जल्लोश करताना दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

 

हा व्हिडिओ संतोष जुवेकरने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संतोष त्याच्या मित्रांसोबत भारताचा झेंडा हातात घेऊन नाचताना दिसत आहे. या व्हायरल पोस्टसोबतच संतोष जुवेकरच्या कॅप्शननेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये त्याने “ह्याला म्हणतात आनंद, काय पाहिजे अजून? बस जिंकत रहावं आपण फक्त आपणच,  I love u my indian cricket team ठोक साला” अशा खतरनाक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – अमेरिकेतील चाहत्याने घरात लावला बिग बींचा पुतळा, किंमत ऐकून व्हाल थक्क
बिग बॉसमधून बाहेर पडताच बला’त्कार आणि जिवे मारण्याची धमकी, ‘या’ दिग्गज अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
भारताच्या विजयाचा अनन्या आणि आयुष्यमानने अशाप्रकारे घेतला आनंद, मजेशीर व्हिडिओ व्हायरल

 

हे देखील वाचा