Monday, July 1, 2024

‘आस्क मी एनीथिंग’ सेशनमध्ये चाहत्याने सोनाक्षीला मागितले बिकिनीतील फोटो; तिनेही दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत ती शेअर करत असते. लॉकडाऊन आणि कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान तिने सोशल मीडियाद्वारे लोकांना मदत केली. अनेक लोकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता, तर अलीकडेच ती चाहत्यांशी संवाद साधताना दिसून आली.

सोनाक्षीने इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन आयोजित केले होते. या सेशनमध्ये चाहत्यांनी तिला अनेक विचित्र आणि मजेदार प्रश्न विचारले. काहींनी तिच्या पायांची फोटो मागितले आणि काहींना तिला बिकिनीमध्ये पाहायचे होते. परंतु सोनाक्षीने विनोदी उत्तरांसह प्रश्न फिरवला.

एका चाहत्याने तिला विचारले की, “काय खाल्यावर वजन कमी होईल.” यावर सोनाक्षी म्हणाली की, “हवा खा तुम्ही! हम्म.” दुसऱ्या चाहत्याने तिला तिच्या पायाचे फोटो शेअर करण्यास सांगितले. ज्यावर तिने फक्त “नाही,” असे लिहिले. एका चाहत्याने तर तिचे बिकिनी फोटो मागितले. सोनाक्षीने बिकिनीचा एक फोटो शेअर केला.

Photo Courtesy: Instagram/aslisona

ट्रोल झाल्यानंतर सोडले ट्विटर
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला गेल्या वर्षी अनेक टीकांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे तिने तिचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे. सोनाक्षी इंस्टाग्रामवरील एका पोस्टबद्दल बोलत म्हणाली की, “मी स्वतःला ट्विटर आणि नकारात्मकतेपासून कसे दूर केले. काही लोक असे साजरा करत आहेत, जसे की त्यांनी काहीतरी जिंकले आहे… पण मी तुमच्यासाठी आनंदी आहे, तुम्हाला वाटत आहे ना… वाटू द्या, कोणाला काही फरक पडत नाही.”

सोनाक्षीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती काही दिवसांपूर्वीच ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्याचबरोबर तिने मार्चमध्ये रीमा कागती आणि ऋचिका ओबेरॉय दिग्दर्शित ‘बुलबुल तरंग’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा तिचा डिजिटल पदार्पण चित्रपट असून तो नेटफ्लिक्सवर प्रकाशित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका

-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट

-जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या एका प्रश्नासाठी बिग बींनी मागितली माफी; केली होती ‘ही’ चूक

हे देखील वाचा