Friday, July 5, 2024

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये राकेशने घटस्फोटाबाबत शमितासमोर केले मन मोकळे; म्हणाला, ‘दोन आठवडे…’

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात रोज अनपेक्षित गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर या घरातील सर्वात चर्चित असलेली जोडी म्हणजे शमिता शेट्टी आणि राकेश बापट ही होय. इतकेच नव्हे तर चाहत्यांकडून या जोडीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. या शोमध्ये दोघे चांगले मित्र बनले आहेत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एकमेकांशी अनेकवेळा बोलताना ही दिसून आले आहेत. दोघेही चांगले मित्र झाले, पण अलीकडेच दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर दोघेही घरातील बागेच्या परिसरात बसून त्यांचे भांडणं सोडवत होते. याचदरम्यान राकेशने शमिताला त्याच्या घटस्फोटाबद्दल मोकळेपणाने सांगितले.

राकेशने शमिताला सांगितले की, बालपण आणि मोठे झाल्यानंतर त्याने आयुष्यात अनेक संकटांना तोंड दिले आहे. यासह त्याने रिद्धी डोगरापासून घटस्फोट आणि वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्यावर काय परिणाम झाला या सर्व गोष्टी सांगितल्या. (At the house of Bigg Boss OTT, Rakesh opened his mouth in front of Shamita and said, ‘I haven’t slept for two weeks’)

दोन आठवडे नव्हती झोप
राकेशने शमिताला सांगितले की, त्याला चिंतेची समस्या आहे. या कारणामुळे तो जवळजवळ २ आठवडे झोपला नव्हता. त्याच्या आजारामुळे त्याची आई आणि बहीण खूप अस्वस्थ झाली होती. त्याची ही अवस्था पाहून त्यांनाही काळजी वाटायची.

राकेश आणि रिद्धीची पहिली भेट ‘मर्यादा लेकिन कब तक’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. जिथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या सात वर्षानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा घटस्फोट झाला.

राकेशने शमिताला केले किस
बिग बॉसच्या घरातील राकेश आणि शमिताची केमिस्ट्री चाहत्यांना आवडत आहे. अलीकडेच राकेशने शमिताला किस करत झोपेतून सकाळी उठवले होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राकेश सकाळी शमिताला उठवतो. शमिता चादरीमधून तिचा हात बाहेर काढते आणि राकेश तिच्या हातावर किस करतो. त्याचबरोबर हे दोघे एकमेकांना भांडणात ही साथ देताना दिसतात. अलीकडेच शमिताची निशांत भट्टसोबत भांडण झाले, त्यादरम्यान राकेश शमितासोबत उभा राहिला होता.

शमिताबद्दल ही गोष्ट सांगितली
राकेशने शमिताबद्दल सांगितले होते की, “आमचे कनेक्शन तयार होऊ लागले आहे. आज आमचे कनेक्शन नुकतेच या पातळीवर पोहोचले आहे की, मॅच्युरिटीसह सर्व गोष्टींकडे पाहत आहोत. एकमेकांना समजूनही घेतो.”

राकेश आणि शमिता हे दोघेही प्रसिद्ध कलाकार आहेत. राकेशने ‘तुम बिन’ आणि ‘वृंदावन’ यांसारख्या अनेक चित्रपटात दिसला आहे, तर शमितानेही ‘मोहब्बतें’, ‘कॅश’, ‘बेवफा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका

-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट

-जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या एका प्रश्नासाठी बिग बींनी मागितली माफी; केली होती ‘ही’ चूक

हे देखील वाचा