Friday, July 25, 2025
Home बॉलीवूड सुनील शेट्टीला लवकरच मिळणार वरबापाचा मान, लेकीच्या लग्नाची केली धुमधडाक्यात तयारी सुरु

सुनील शेट्टीला लवकरच मिळणार वरबापाचा मान, लेकीच्या लग्नाची केली धुमधडाक्यात तयारी सुरु

हिंदी चित्रपट जगतात सध्या एकापाठोपाठ एक प्रेमप्रकरणे समोर येत असून लग्नाचा धुमधडाका सुरू आहे. नुकताच अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आता आणखी एका प्रेमप्रकरणाची उघडपणे चर्चा सुरू झाली आहे. ही लवस्टोरी आहे अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटपटू केएल राहूलची (K.L.Rahul). दोघांनीही त्यांच्या प्रेमाची जाहीरपणे कबुली  दिली असून दोघेही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत अशी चर्चाही सुरू झाली आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी काही दिवसांपूर्वी लग्न केले आणि त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्याचवेळी आता बॉलिवूडची आणखी एक जोडी म्हणजेच अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलही लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत. अथिया शेट्टी आणि केएल राहुल बर्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि चाहत्यांना दोघांनी लवकरात लवकर लग्न करावे अशी इच्छा आहे. त्याचवेळी आता त्यांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. डेटिंग लाइफ एन्जॉय केल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या या निर्णयामुळे त्यांचे पालकही खूप खूश आहेत. अथिया शेट्टीच्या कुटुंबीयांनी या लग्नाची तयारी सुरू केली आहे. या वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्न करणार आहेत.सुनील शेट्टीचे कुटुंब दक्षिण भारतीय आहे आणि केएल राहुल देखील दक्षिण भारतातील आहे. त्यामुळे अथिया आणि केएल राहुलचा विवाह दक्षिण भारतीय परंपरेनुसार होणार आहे. मात्र, या वृत्तांवर सुनील शेट्टीकडून फारशी प्रतिक्रिया आलेली नाही. सुनील शेट्टी यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

काही काळापूर्वी सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीच्या लग्नाची बातमी समोर आली होती. अहान त्याची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती, त्यामुळे सुनील शेट्टी संतापला होता. त्यांनी या घटनेचा निषेध करताना “अशा वृत्ताने आनंदी व्हावे की दुःखी व्हावे हे समजत नाही. अशा बातम्या लिहिण्यापूर्वी वस्तुस्थिती नीट पडताळून पाहावी, असेही त्यांनी लिहिले होते. अशा बेजबाबदार वार्तांकनामुळे पत्रकारितेची विश्वासार्हता कलंकित होते.” असे ट्विट करत आपला संताप व्यक्त केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा