Saturday, June 29, 2024

केएल राहुलने हटके अंदाजात दिल्या अथिया शेट्टीला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा, पोस्ट झाली व्हायरल

नुकताच व्हॅलेंटाइन डे साजरा झाला. सामान्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनीच त्यांचे त्यांच्या जोडीदाराप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. बॉलिवूडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात आला. अनेक कलाकारांनी त्यांच्या पार्टनरला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या प्रेम दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये एक पोस्ट खूपच भाव खाऊन जात आहे, आणि ती पोस्ट म्हणजे क्रिकेटर केएल राहुलची. अभिनेत्री अथिया शेट्टीला उद्देशून त्याने व्हॅलेंटाइन डेची एक पोस्ट शेअर केली आहे. टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुल (kl rahul) आणि अथिया शेट्टी (athiya shetty) यांचे खास नाते आता अधिकृत झाले आहे. व्हॅलेंटाईन डेला राहुलने इंस्टाग्रामवर अथियासोबतचा एक फोटो शेअर करत तिला विश केले आहे.

अथिया आणि राहुलचा एक मिरर सेल्फी राहुलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत अथियाला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये दोघे सोबत दिसत असून, अथियाने काळ्या रंगाच्या डेनिमसोबत पांढऱ्या रंगाचा पूर्ण बाह्या असलेला प्रिंटेड टॉप घातला आहे. तर राहुलने पांढऱ्या रंगाचा टिशर्ट आणि करड्या रंगाची पँट घातली आहे. अथिया आणि राहुलचा हा फोटो आणि ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून, या पोस्टवर अनेक कलाकार, क्रिकेटर, फॅन्स कमेंट्स करताना दिसत आहे. स्वतः अथियाने देखील यावर कमेंट करत हार्ट ईमोजी पोस्ट केले आहे.

राहुल आणि अथिया यांच्याबद्दल मागील बऱ्याच काळापासून अनेक बातम्या येत होत्या. भारतीय संघाच्या प्रत्येक सामना दरम्यान अथिया राहुल पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असायची. मग ते सामने भारतात असले काय आणि भारताबाहेर असले काय. यामुळे त्यांच्यावर अनेकदा मीडियामधून, फॅन्सकडून प्रश्नाचा भडीमार देखील झाला, मात्र दोघांनी यावर मौन बाळगले. मात्र आता त्यांचे नाते जगजाहीर आहे. राहुल आणि अथिया नेहमीच एकमेकांसाठी पोस्ट शेअर करताना दिसतात. अथियाचा भाऊ असलेल्या अहान शेट्टीच्या ‘तडप’ या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियर देखील दोघांनी सोबतच एन्ट्री मारली होती. तेव्हा देखील त्यांच्यावर खूपच चर्चा रंगल्या.

अथियाने ‘हिरो’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून, तिने आतापर्यंत ‘मुबारक’ आणि ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटांतही झळकली आहे. मात्र तिला बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही.

हेही वाचा –

हेही पाहा- 

हे देखील वाचा