Wednesday, June 26, 2024

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाचा लूक ‘या’ डिझायनरने केला होता फायनल

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांचे नुकतेच लग्न झाले. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा मीडियामध्ये आणि बॉलिवूडमध्ये गाजत होत्या. कोणाकडूनही या लग्नाबद्दल अधिकृत माहिती आली नसताना देखील मीडियाला या लग्नाबद्दल सुगावा लागला आणि त्यांनी या लग्नाबद्दल सर्व माहिती लोकांना दिली. मागील काही वर्षांपासून अथिया आणि राहुल रिलेशनशिपमध्ये होते, अखेर लग्न करून त्यांनी त्यांचे नाते अधिकृत केले. २३ जानेवारी रोजी त्या दोघांचे लग्न झाल्यानंतर सुनील शेट्टीने मीडियाला लग्न झाल्याची माहिती दिली. मात्र सर्वांनाच नवीन जोडप्याला बघण्याची खूपच उत्सुकता होती. अखेर अथिया आणि राहुल मीडियासमोर आले.

अथिया आणि राहुल हे नवविवाहित जोडपे मीडियासमोर आल्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या दोघांच्या लग्नासोबतच त्यांच्या लुक्सची देखील तुफान चर्चा सध्या होत आहे. या दोघांचाही लूक नेटकऱ्यांना तुफान आवडला, सोबतच त्यांचा ड्रेस देखील चर्चेचा विषय ठरत आहे. अथिया आणि राहुल या दोघांनीही अनामिक खन्नाने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता.

अथिया शेट्टीने तिच्या लग्नासाठी पेस्टल पिंक कलरचा लेहेंगा घातला होता. यासोबत तिने कुंडांची ज्वेलरी घातली आणि तिचा लूक पूर्ण केला होता. तर राहुलने देखील तिच्या ड्रेसला मॅचिंग अशी पेस्टल पिंक कलरची शेरवानी त्याने घातली होती. दोघांचाही लूक त्यांना सूट होत होता. त्यांचा लूक अनेकांना आवडला तर काहींनी त्यांच्या लूकची तुलना अनुष्का आणि विराटच्या लूकही केली. दरम्यान अथिया आणि राहुल यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि एकेमकांबद्दल असलेले प्रेम स्पष्ट दिसत होते.

तत्पूर्वी अथिया आणि राहुल यांनी सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न केले या लग्नात त्यांच्या जवळचे अतिशय मोजके लोकंच उपस्थित होते. जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, कृष्ण श्रॉफ, अर्जुन कपूर, अंशुला कपूर आदी कलाकार उपस्थित होते. तर क्रिकेटरमध्ये ईशान शर्मा उपस्थित होता. अथिया आणि राहुल यांच्या लग्नाचे रिसेप्शन आयपीएलनंतर दिले जाणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आम्ही चित्रपट केलेच नाहीत तर…’, बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर बोलली प्रसिद्ध अभिनेत्री

केएल राहुल अन् अथियाच्या संगीतात ‘बेशरम रंग’वर थिरकले स्टार, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा